अार्थाेपेडिक उपचारात प्रगतीच्या दिशेने नवीन बदल हाेत असून पुण्यातील संचेती रुग्णालयाने बाेन बँकचा वापर अाता अाघात झालेले व काही हाडांचे विकार असलेल्या रुग्णांच्या उपचारात सुरु केले अाहे. यामाध्यमातूनच हाडांचे उपचारांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ब
?
रुग्णालयातील बाेन बँकेचे प्रमुख डाॅ.प्रमाेद भिलारे म्हणाले, बाेन बँकचे कार्य हे रक्तपेढी सारखेच असते. यात दात्यांकडून काही विशिष्ट शस्त्रक्रिया दरम्यान वाया जाणाऱ्या हाडांचे भाग प्राप्त करुन ते साठवले जातात. यासाठी दात्यांची कडक निकषांनुसार तपासणी केल्यावरच ही प्रक्रिया केली जाते. बाेन बँकेत जिवंत दात्यांकडून प्राप्त हाडे ही उणे ८६ डिग्री इतक्या कमी तापमानात सुमारे सहा महिने साठवली जातात.खुब्याचा संधिवात, अव्हॅसक्युलर नेक्राेसिस, नेक अाॅफ फेमर फ्रॅक्चर (मांडीत असलेले लांब हाडाचे फ्रॅक्चर) अशा स्थितीसाठी खुबा किंवा गुडघ्याच्या सांध्यांची शस्त्रक्रिया ज्यांच्यावर केली जाते ते सामान्यत: दाते बनू शकतात. दात्याच्या शरीरातून काढलेले हाडांच्या भागांवर गाेठविण्यापूर्वी अनेक चाचण्या केल्या जातात. ही काढलेली हाडे किंवा त्यांचे भाग हे अनेक पुर्नरचनात्मक प्रक्रियांसाठी उपयुक्त ठरु शकतात. विशेष करुन अाघातामुळे झालेले हाडांचे विकार किंवा हाडांमधून ट्युमर काढण्याच्या शस्त्रक्रीया दरम्यान याचा वापर हाेऊ शकताे.यामुळे दात्यात पण गुंतागुंत हाेण्याची शक्यता कमी असते व चांगले परिणाम दिसून येतात.
अातापर्यंत जिवंत दात्यांकडून दान केलेली १०० हाडे गाेठविण्यात अाली अाहे. त्याचा वापर गरजू रुग्णांसाठी केला जात अाहे. सध्या खुबा व गुडघ्यातील हाडांच्या भाेवती राेपण शस्त्रक्रिया करण्यात अालेल्या रुग्णांकडून हे प्राप्त केले जात अाहे. विविध चाचण्या हाडांची गुणवत्ता व कुठला संर्सग नाही ना याची खात्री करण्यासाठी केला जाताे.पात्र ठरल्यानंतर ही हाडे काढून गाेठवली जातात. या उपक्रमामुळे अशा शस्त्रक्रिया मध्ये एरवी वाया जाणाऱ्या संसाधनांचा इष्टतम वापर शक्य झाला अाहे. काही बाबतीत धांतुच्या राेपणाचा वापर कमी करण्यास देखील त्यामुळे मदत हाेत अाहे.
































