Homeदेश-विदेशछापा: भारतातील 16 घटनांमधील वाँटेड दहशतवादी हॅपी अमेरिकेत अटकेत, एनआयएच्या माहितीवरून एफबीआयची...

छापा: भारतातील 16 घटनांमधील वाँटेड दहशतवादी हॅपी अमेरिकेत अटकेत, एनआयएच्या माहितीवरून एफबीआयची कारवाई

देश-विदेश : भारतात १६ प्रकरणांतील दहशतवादी हॅपी पासिया ऊर्फ ​​हरप्रीत सिंहला अमेरिकेत अटक केली. कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो शहराबाहेरील भागात अमेरिकन तपास संस्था एफबीआयने हॅप्पीला छापा टाकून अटक केली. या कारवाईत एफबीआयसोबत यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स (आयसीई) टीमही होती. पंजाबमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यांसाठी जबाबदार हॅप्पीची अटक ही भारतीय यंत्रणांसाठी एक मोठे यश आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासात तैनात एफबीआयच्या विशेष अधिकाऱ्याला (अ‍ताशे) दहशतवादी हॅप्पी सॅक्रामेंटोमध्ये लपल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून भारतीय गुप्तचर संस्था दहशतवादी हॅप्पीच्या मागावर होते.

एनआयएने दहशतवादी हॅपीला फरार घोषित केले होते. त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीसही होते. पंजाब पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, हॅप्पीविरुद्ध एकूण ३३ एफआयआर नोंदवले आहेत तर १० लूकआउट नोटिसा जारी केल्या आहेत. अमृतसर जिल्ह्यातील अजनाला येथील दहशतवादी हॅप्पीने एप्रिल २०२४ मध्ये गुरुदासपूरमधील पोलिस बॅरेकवर केलेला रॉकेट हल्ला व नोव्हेंबर २०२४ मध्ये उर्वरित. पान ८

कोर्टात जाऊ शकत नाही, प्रत्यार्पण नाही, थेट भारतात पाठवणार

दहशतवादी हॅपी अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसला होता. भारताच्या विनंतीवरून अमेरिकन एजन्सींनी त्याला अटक केली. तो भारतात गुन्हेगारी प्रकरणांमध्ये हवा आहे, त्यामुळे तो अमेरिकन न्यायालयात जाऊ शकत नाही. अमेरिका त्याचे प्रत्यार्पण करणार नाही, त्याला थेट भारतीय एजन्सींद्वारे हद्दपार केले जाईल. आजकाल अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक होणे भारतासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. भारतातील १७८ वॉन्टेड गुन्हेगारांपैकी ६५ सध्या अमेरिकेत लपून बसले आहेत. अमेरिका आणि कॅनडामधील सहज हालचाल देखील त्यांच्या पकडण्यात अडथळा ठरते. अमेरिकेत फास घट्ट झाला की हे गुन्हेगार कॅनडाला पळून जातात. तिथे त्यांना भारतविरोधी शक्तींचा पाठिंबा मिळतो. जर कॅनडामध्येही कडक कारवाई झाली तर इतर वॉन्टेड व्यक्तींच्या अटकेला गती मिळू शकते. सौ.दिव्यमराठी.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!