Homeपुणे / पिंपरी-चिंचवडVeteran actress Bharti Gosavi passed away भारती गोसावी यांचे निधन

Veteran actress Bharti Gosavi passed away भारती गोसावी यांचे निधन


पुणे : मराठी रंगभूमीवर गेल्या सहा दशकांमध्ये ८० नाटकांतून सव्वाशेहून अधिक भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती बाळ गोसावी (वय ८३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगी, जावई आणि नात असा परिवार आहे. त्या अभिनेते बाळ गोसावी यांच्या पत्नी, तर ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांच्या भावजय होत. भारती गोसावी यांच्या पार्थिवावर शनिवारी (२४ मे) दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भारती गोसावी या माहेरच्या दमयंती कुमठेकर. घरामध्ये नाटकाचे वातावरण असल्याने त्यांचा रंगभूमीवर सहज प्रवेश झाला. संगीत सौभद्र नाटकात स्वरराज छोटा गंधर्व यांच्यासमवेत १९५८ मध्ये त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. संशयकल्लोळ, मानापमान या नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. पौराणिक, ऐतिहासिक, संगीत नाटकांसह लोकनाट्य, फार्सिकल, कौटुंबिक, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या नाटकांतून भूमिका करताना भारती गोसावी यांनी अण्णासाहेब किलोंस्कर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा दिग्गज नाटककारांची भाषा समर्थपणे पेलली.

बाळ गोसावी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर पती आणि दीर राजा गोसावी यांच्यामुळे त्यांची नाट्यकारकीर्द सुरू राहिली. त्यांनी अत्रे थिएटर्स, कलावैभव, चंद्रलेखा, नाट्यमंदार संस्थांच्या नाटकांत काम केले. काशिनाथ घाणेकर, अविनाश खर्शीकर यांच्यासमवेत त्यांनी ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकामध्ये गीताची भूमिका केली.

हेही वाचा





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे...

0
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पायी पालखी सोहळयाचे रविवारी ता. ५ पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...

वॉशिंग्टनमध्ये इतिहासातील सर्वात मोठी आतषबाजी, राजधानी उजळली:न्यूयॉर्कमध्ये एअर शो, मियामीत कॉन्सर्ट; अमेरिकन स्वातंत्र्य सोहळ्याचे...

0
आज अमेरिका आपल्या स्वातंत्र्याचा २५० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने वॉशिंग्टन डी.सी., न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, टेक्सास आणि मियामीसह देशभरात संचलन (परेड),...
spot_img

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...

Instagram बाल अत्याचार जाहिराती अवरोधित; मेटा 7-दिवसांची सूचना दिली

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंस्टाग्रामवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींबाबत सरकारने मूळ कंपनी मेटाला नोटीस पाठवली. न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, कंपनीला...

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...
error: Content is protected !!