Homeमहाराष्ट्रTwo-year-old boy dies with serious injuries, death toll rises to three |...

Two-year-old boy dies with serious injuries, death toll rises to three | टोकाई फाट्याजळ भीषण अपघात: गंभीर जखमी असलेल्या दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू, मृतांची संख्या तीनवर – Hingoli News

वसमत तालुक्यातील कोठारी ते टोकाई फाटा या मार्गावर भरधाव कार ट्रक खाली शिरल्याने झालेल्या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या दोन वर्षाच्या बालकाचा शनिवारी ता ३१ नांदेड येथे रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची संख्या आता तीन झाली आ

?

कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी व बोल्डा येथील एका कुटूंबातील काही जण ३० मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कारने (क्र एमएच १२ ईएम २५१५) यामधून बोल्डा येथून वसमतकडे निघाले होते. सदरील कार कोठारी ते टोकाई मार्गावर टोकाई फाटा शिवारात आली असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असलेला नादुरूस्त टिप्परच्या (क्र एमएच २५ यु १४५९) पाठीमागुन आत घुसली. त्यानंतर कार रस्त्याच्या खाली जाऊन तीन वेळा उलटली. या अपघातात कारचा चुराडा झाला.

याअपघातामध्ये अमिर अतिक अहेमद सिद्दिकी (२३), उमरखान सुजातखान पठाण (४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर फारूख खान सुजातखान पठाण (२ वर्ष) याचा नांदेड येथे उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातील मृतांची संख्या तीन वर पोहोचली आहे.

दरम्यान या अपघातातील जखमी झालेल्या अतिक अहेमद रफीक अहेमद सिद्दिकी (५२) सुलताना बेगम अतिक अहेमद सिद्दिकी (४५), आरेफ अतिक अहेमद सिद्दिकी (२४), आलिया अतिक अहेमद सिद्दिकी (१५), सुजातखान मदरखान पठाण (४६), रेश्माबी सुजातखान पठाण (३५) वर्ष, चालक सय्यद इरशाद शाहरूख सय्यद इसाक (३६) या सात जणांवर कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले आहे. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटने प्रकरणी कुरूंदा पोलिसात ३१ मे रोजी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...
spot_img

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
error: Content is protected !!