Homeमहाराष्ट्रTwo brothers killed, four injured in Koparwadi Shivara hit by speeding tipper,...

Two brothers killed, four injured in Koparwadi Shivara hit by speeding tipper, both had come from Pune to meet their grandparents | भरधाव टिप्परच्या धडकेत दोन भावाचा मृत्यू: चौघे जखमी, हिंगोलीच्या कोपरवाडी शिवारातील घटना – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी शिवारात भरधाव टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुपटी येथील दोन सख्या भावाचा मृत्यू झाला तर चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ता. 18 रात्रीच्या सुमारास घडली आहे. जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण

?

पोलिसांनी टिप्पर व चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील कुपटी येथील मुळचे रहिवासी असलेले संतोष माहोरे हे मागील काही वर्षापासून पुणे येथे राहतात. त्या ठिकाणी खाजगी कंपनीमध्ये ते काम करतात. हिंगोली येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी माहोरे कुटुंबिय हिंगोलीत आले होते. त्यानंतर त्यांची मुले अरुण संतोष माहोरे (18), अनिकेत संतोष माहोरे (17) हे त्यांचा मित्र अनिकेत मुळे यांच्यासह कोपरवाडी येथे आजी आजोबांना भेटण्यासाठी गेले होते.

दरम्यान, रविवारी ता. 18 रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते गावाजवळ थांबले असतांना रामेश्‍वरतांडा येथून तलावातील काळीमाती घेऊन कोपडवाडीकडे निघालेले टिप्पर कोपरवाडी येथील आबादानी येथे आले असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले या अपघातात टिप्परची रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा जणांना धडक बसली. या अपघातात सर्व सहा जण जखमी झाले. यामध्ये अनिकेत माहोरे (17), गजानन मुकाडे (18), संदीप मारकड (21), अरुण माहोरे (18), वैभव डुकरे (18), अनिकेत मुळे (18), यांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार सुनील रिठ्ठे, पिराजी बेले, राजीव जाधव, विजय जाधव, शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र अनिकेत माहोरे व अरुण माहोरे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र नांदेड येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेमुळे माहोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत माहोरे बंधूच्या पश्‍चयात आई, वडिल, एक भाऊ असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिसांनी टिप्पर जप्त केला असून चालकालाही ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अनंत अंबानींनी धीरेंद्र शास्त्रींचा हात पकडून ओढले, व्हिडिओ:बागेश्वर धाममध्ये म्हणाले- तुम्ही यायला सांगितले होते,...

0
देशातील प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी गुरुवारी संध्याकाळी विशेष विमानाने बागेश्वर धाम येथे पोहोचले. फोटो सेशनदरम्यान एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. फोटो काढताना अनंत...

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’चे आयोजन

0
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध...

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे;...

0
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या...

शुक्र का राशिफल, मराठीत शुक्र सिंह राशिफळ, सिंह राशीत शुक्र, राशिचक्र १२ राशी,

0
13 तासांपूर्वीलिंक कॉपी करा४ जुलै रोजी वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र राशी बदलत आहे. हा ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि ४...
spot_img

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...
error: Content is protected !!