Homeमहाराष्ट्रTrimbakeshwar, Nashik's Kumbh Mela will be 12 times bigger than last time....

Trimbakeshwar, Nashik’s Kumbh Mela will be 12 times bigger than last time. Last time there were 1 crore devotees, this time it is estimated to be 12 crores. | अमृतपर्व: त्र्यंबकेश्वर, नाशिकचा कुंभमेळागतवेळेपेक्षा 12 पट माेठा हाेणार, गतवेळी होते 1 कोटी भाविक, या वेळी 12 कोटींचा अंदाज – Nashik News

त्र्यंबकेश्वर व नाशिकमध्ये २०२७ ला २ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान कुंभमेळ्यात प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा अमृतस्नान होणार आहेत. २२ महिन्यांचे पर्व असून नाशिकमध्ये ४४ तर त्र्यंबकेश्वरला ५३ पर्वस्नानाचे मुहूर्त आहेत. सरकारने १५ हजार काेटींचा प्राथमिक आर

?

जिल्हाधिकारी कार्यालयात फडणवीस व १३ आखाड्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पुढील वर्षी ३१ ऑक्टाेबरला दुपारी १२ वाजून ०२ मिनिटांनी रामकुंडावर ध्वजाराेहणाने कुंभमेळा सुरू होईल. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वरला कुशावर्ताप्रमाणेच स्नानासाठी वेगळे कुंड तसेच नाशिकमध्येही घाटांची संख्या वाढवण्यात येईल.

‘दिव्य मराठी’ने उपस्थित केलेल्या या ५ मुद्द्यांवर चर्चा

1. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामयस्वरूपी जमीन अधिग्रहित करण्याची साधू-महंतांची मागणी फडणवीस : साधुग्रामसाठी यंदा शासनाकडून कामयस्वरूपी जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही बैठक झाली असून लवकरच निर्णय हाेणार आहे. 2. सिंहस्थ प्राधिकरणामध्ये अधिकाऱ्यांसाेबत समावेशाची साधू-महंतांची मागणी या मुद्द्यावर फडणवीस यांनी मात्र चुप्पी साधली.फक्त लवकरच प्राधिकरण गठित केले जाईल असे त्यांनी सांगितले. 3. कुंभमेळ्यासाठी निधीची प्रतीक्षा बैठकीत कुंभमेळ्याबाबत काेणत्याही निधीची घाेषणा करण्यात आली नाही. मात्र ६००० काेटींची कामे सुरू असून एकही रुपया कमी पडणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 4. नावाला विराेध : त्र्यंबकेश्वर- नाशिक अशी कुंभमेळ्याची ओळख करण्याची त्र्यंबकच्या आखाड्यांची मागणी पत्रकार परिषदेत फडणवीसांकडून जाणीवपूर्वक त्र्यंबकेश्वर-नाशिक सिंहस्थ अमृतपर्व असा उल्लेख करण्यात आला. 5. गाेदावरी प्रदूषणाबाबत साधू-महंतांकडून नाराजी गाेदावरी बारा महिने वाहती ठेवत प्रदूषणमुक्तीचा प्रयत्न. राज्य सरकारने यासाठी प्लॅन ए व प्लॅन बी तयार केला आहे. तसेच एसटीपी प्लँटचे टेंडर मंजुरीस शासनाकडे आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

त्र्यंबक रोड विस्तारीकरण, गोदेवर ९ पुलांचे बांधकाम

त्र्यंबक रोडचे विस्तारीकरण, गोदावरीवर जवळपास नऊ पुलांचे बांधकाम तसेच जल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. रामकाल पथाचीही महत्त्वाकांक्षी योजना साकारण्यात येणार आहे.

गतवेळीपेक्षा निधीही तिपटीने मिळणार

नाशिकला गतवेळी २३७८ कोटींचा निधी मिळाला होता. या वेळी आताच ६ हजार कोटींच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रयागराजला या वेळी ४५ कोटी भाविक आले होते. ७५०० कोटी निधी मिळाला होता.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा...

0
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक...

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...
spot_img

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
error: Content is protected !!