Homeमहाराष्ट्रवाहतुकीच्या पोलिसांनी ठाणे झेडडब्ल्यूएस 70 मध्ये सहा महिन्यांत रिक्षा चालकांवर 13 कोटी...

वाहतुकीच्या पोलिसांनी ठाणे झेडडब्ल्यूएस 70 मध्ये सहा महिन्यांत रिक्षा चालकांवर 13 कोटी दंड ठोठावला


ठाणे : शहरात काही मुजोर रिक्षा चालकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर मागील सहा महिन्यात ठाणे वाहतुक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा महिन्यात ठाणे वाहतुक पोलिसांनी १३ कोटी १५ लाख २२ हजार ३५० रुपये इतका दंड रिक्षा चालकांवर आकारला आहे.

एक लाख १० हजार ४७३ ई- चलानद्वारे ही कारवाई झाली असून अनेक रिक्षा चालकांवर चार ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त चलान आहेत. रिक्षातून अधिक प्रवासी वाहतूक, रिक्षा थांबा सोडून प्रवासी वाहतूक करणे, बेदरकार रिक्षा चालवणे अशा प्रकारच्या कारवाईचा सर्वाधिक समावेश आहे.

ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे ठाणे आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरात सुमारे लाखभर रिक्षा आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे, औद्योगिक क्षेत्र, गोदामे आणि लघु उद्योग आहेत. यामुळे पर्यटक, नोकरदार, व्यवसायिक हे या भागात शहरांत येत असतात.

सार्वजनिक बसगाड्यांची सुविधा अपुऱ्या असल्याने काही प्रवासी वेळ वाचावा यासाठी रिक्षा वाहतुकीवर अवलंबून असतात. याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करू लागले आहेत. अशा रिक्षा चालकांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ठाणे वाहतूक पोलिसांनी यावर्षी १ जानेवारी ते २३ जून या कालावधीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर ई- चलान यंत्राद्वारे कारवाई केली. यामध्ये एक लाख १० हजार ४७३ ई चलानद्वारे कारवाई करण्यात आली. तसेच १३ कोटी १५ लाख २२ हजार ३५० रुपये इतका दंड आकारला आहे.

हेही वाचा

रिक्षा चालक गणवेशात नसणे, रिक्षा परवाना नसणे, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, रिक्षा थांबा सोडून बाहेर थांबणे, चालकाच्या बाजूला प्रवासी बसविणे, सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणे, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन अशा विविध उल्लंघनांचा समावेश आहे.

हेही वाचा

जागा नसतानाही प्रवासी रिक्षामध्ये बसण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रिक्षा चालक देखील चार किंवा पाच प्रवासी घेऊन वाहतुक करतात. प्रवाशांनी रिक्षामध्ये जागा नसताना चालकाच्या बाजूला बसण्याचा प्रयत्न करू नका आणि चालकांनी रिक्षामध्ये तीन पेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करू नये. तसेच रिक्षा चालकांनी गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. जिथे रिक्षा थांबा नाही तिथे वाहने उभी करू नये. पंकज शिरसाटपोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

दंडात्माक कारवाई आकडेवारी

ई -चालन शिक्षा

१) चालकाच्या बाजूला प्रवासी बसवणे             ६५ हजार ७७६                         ८ कोटी ६० लाख ६८ हजार

२) रिक्षा थांबा सोडून बाहेर थांबणे              १२ हजार ७५३                      १ कोटी ५८ लाख ७६ हजार ५००

३)सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणे १० हजार ३६९                         १ कोटी ११ लाख २६ हजार ५००

४) गणवेशाशिवाय वाहन चालवणे                        ७ हजार ७५१                         ८५ लाख ८ हजार

५) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी                          ७ हजार ०३७                         १४ लाख ४ हजार ८००

६) वाहतूक सिग्नलचे उल्लंघन                         २ हजार ०३९                         १६ लाख ७९ हजार ५००

७) एकेरी मार्ग उल्लंघन                                    १ हजार ९४१                         १४ लाख ३ हजार

८) पोलीस आदेश पाळला नाही                         १ हजार १८१                         ८ लाख ८१ हजार२५०

९) प्रवासी नेण्यास नकार                                    ४९७                                   २४ हजार ८००

१०)वैध विम्याविना वाहन चालवणे                         ४७४                                     १० लाख १० हजार

११)परवाना नसलेले चालक                         ३६६                                     ३५ लाख ४० हजार

ही क्विझ एआय-व्युत्पन्न आहे आणि केवळ एड्यूटेनमेंटच्या उद्देशाने आहे.

१२)मद्यप्राशन करून वाहन चालवणे            २८९                                                  –





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा:स्थानिकांचा विरोध झुगारून 24 हातगाड्या जप्त,...

0
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर शुक्रवारी (१७ जुलै) मोठी कारवाई केली. या मोहिमेत २४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या...

राहुल गांधींची डेहराडूनमध्ये 8 हजार विद्यार्थ्यांशी चर्चा:म्हणाले- 1% लोक पेपरफुटीच्या मार्गावर चालतात, यामुळे 99%...

0
डेहराडूनमधील बन्नू स्कूल ग्राउंडवर आयोजित काँग्रेसच्या 'विद्यार्थ्यांची गर्जना' कार्यक्रमात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी, भरती व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य हे सर्वात...

17 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न सुरू होऊ शकते, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत...

0
शुक्रवार, 17 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होऊ शकते आणि व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या नोकरदार...

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...
spot_img

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...
error: Content is protected !!