Homeदेश-विदेशऑफिसमध्ये लंच ब्रेक न घेण्याचा ट्रेंड: वर्क स्टेशनवर जेवतात 62 टक्के कर्मचारी, यामुळे...

ऑफिसमध्ये लंच ब्रेक न घेण्याचा ट्रेंड: वर्क स्टेशनवर जेवतात 62 टक्के कर्मचारी, यामुळे उत्पादकता घटते

न्यूयॉर्क : बदलत्या वर्क कल्चरमध्ये ऑफिस लंच ब्रेकचा ट्रेंड कमी होत आहे. पूर्वी कामाच्या दरम्यान लंच ब्रेक घेऊन आरामात जेवण करण्याची पद्धत होती. आता मात्र वर्कस्टेशनवर काम करताना सँडविच खाण्यापर्यंतच हे मर्यादित राहिले आहे. अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणानुसार, ६२% कर्मचारी आता त्यांच्या वर्क स्टेशनवरच जेवण करतात.

ही सवय केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक आरोग्य आणि उत्पादकतेसाठीही घातक ठरत आहे. संशोधकांचे मत आहे की, लंच ब्रेकच्या वेळी कामापासून दूर राहून जेवण केल्याने केवळ शरीराला आराम मिळत नाही, तर मेंदूही नव्या उर्जेसह सक्रिय होतो.

अमेरिकेत २५-३० वर्षे काम केलेले कर्मचारी सांगतात की, कधी काळी लंच टाइम म्हणजे कामापासून पूर्ण ब्रेक असायचा. कर्मचारी आणि वरिष्ठ एकत्र जेवण करायचे, नवीन विचारांवर चर्चा करायचे. लंच ब्रेक केवळ पोट भरण्याचा नव्हे, तर टीम बांधण्याची एक संधी असायची. पण गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड बदलला आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे ही सवय अधिक बदलली आहे. या ट्रेंडमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कंपनी आणि नोकरीबद्दल असंतोष वाढला आहे. टॉर्कच्या सर्वेक्षणानुसार, जे कर्मचारी नियमित लंच ब्रेक घेतात ते त्यांच्या नोकरीबद्दल समाधानी असतात.

डिजिटल युगात लंच ब्रेक वेळेची नासाडी मानले जाते

आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक मिनिटाची गणना होते तिथे लंच ब्रेकला वेळेची नासाडी मानले जाते. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, ‘लंच ऑवर’ ‘लंच मिनिट्स’मध्ये रूपांतरित झाला. संशोधक एरिक जॉन्सन म्हणतात, ऑफिसमध्ये भलेही वेग वाढला असेल, पण शरीर व मेंदू अजूनही तेच आहेत. त्यांना मध्ये एक छोटासा रिफ्रेश बटनची गरज आहे. शरीर, मेंदू व करिअर तीनही गोष्टींसाठी लंच ब्रेक आवश्यक आहे.

ब्रेक न घेता दीर्घकाळ बसणे धूम्रपानाच्या सवयीसारखे घातक : डब्ल्यूएचओ

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, ब्रेक न घेता सतत काम करत राहणे आपल्या शरीरासाठी विष बनत आहे. यामुळे सांधे आखडणे, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो. डब्ल्यूएचओच्या मते, ‘दीर्घकाळ बसणे धूम्रपानाच्या सवयीसारखे धोकादायक आहे.’ जेव्हा मेंदूला सतत कामात झोकून दिले जाते तेव्हा तो थकतो. ब्रेक न घेता काम केल्याने कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता संपते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. बर्नआऊटचा धोका वाढतो.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!