Homeपुणे / पिंपरी-चिंचवड‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद !

‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद !

 अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच  ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते

       पुणे – वर्ष १९४२ मध्ये मध्ये स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊ नये म्हणून साम्यवाद्यांनी इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती, याची नोंद इतिहासात आहे. अशा इंग्रजांच्या हस्तकांना सन्मान देण्याचे काम पंडित नेहरूंनी केले. बंगालमधील नक्षलवाद असो वा पंजाबमधील खलिस्तानी समस्या, काँग्रेसने कधीच त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही. आज देशासमोर उभ्या ठाकलेल्या अर्बन नक्षलवादाच्या समस्येचे खरे जनक हे काँग्रेसच आहेत, असे ठाम प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते श्री. माधव भांडारी यांनी केले. परिसंवादात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन श्री. चैतन तागडे यांनी केले.

     पुणे येथील टिळक स्मारक मंदिर येथे १९ ऑगस्ट या दिवशी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ च्या वतीने ‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात ‘असत्यमेव जयते’ आणि ‘डावी वाळवी’ या पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक अभिजित जोग, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, लेखक-विचारवंत श्री. विक्रम भावे आणि श्री. ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रसाद काथे हे मान्यवर सहभागी झाले होते.पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून विविध क्षेत्रांतील अभ्यासू, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी असे १ हजारपेक्षा अधिक राष्ट्रभक्त नागरिक प्रचंड पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने या परिसंवादाला उपस्थित राहिले.

     या वेळी श्री. सुनील घनवट म्हणाले की, अर्बन नक्षलवादाविरोधात लढण्यासाठी हिंदूंची स्वतःची इकोसिस्टीम उभी केली पाहिजे. साम्यवादी आर्थिक बळावर आक्रमण करतात. पुरस्कार परत केले पण मिळालेले पैसे ठेवले हे त्यांचे दुटप्पी धोरण आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन कृतीशील पावले उचलण्याची गरज आहे ! श्री. अभिजित जोग यांनी स्पष्ट केले की, साम्यवाद्यांचे प्रमुख शस्र म्हणजे समाजात सतत अराजक निर्माण करणे. गरीब-श्रीमंत, स्री-पुरुष यांच्यात संघर्ष उभा करणे व भारतीय संस्कृतीवर वारंवार हल्ले करणे हे त्यांचे तंत्र आहे. त्यामुळे या लढ्याला वैचारिक स्तरावर उत्तर देणे आवश्यक आहे. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अधोरेखित केले की, व्यवस्थेची मानसिकता बदलल्याशिवाय नवीन कायद्यांचा उपयोग मर्यादित राहतो. हिंदूंनी प्रत्येक कार्यात ईश्‍वरी अधिष्ठान ठेवले पाहिजे. तसेच जनसुरक्षा कायद्याला अधिक कडक आणि व्यापक स्वरूप देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. विक्रम भावे यांनी अनुभव मांडताना सांगितले की, कारागृहात असताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे, की शहरी नक्षलवादी कैद्यांच्या मनात भारतीय संस्कृतीविषयी विष पेरत होते. त्यामुळे या संघर्षात प्रत्येकाने हिंदू म्हणून उभे राहिले पाहिजे.

     परिसंवादचे सूत्रसंचालक श्री. प्रसाद काथे यांनी आवाहन केले की, हिंदु संस्कृतीला पर्याय नाही. इतर पंथांना त्यांचे देश आहेत; पण हिंदूंना भारताशिवाय दुसरा आधार नाही. आपल्या पूर्वजांनी खस्ता खाल्ल्या आहेत; त्यामुळे आता आपल्यालाच सजग व्हावे लागेल.

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!