राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी 13 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला असला तरी, महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच नाराजीतून त्यांनी आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादीला दिले जात नसल्याची उघड खंत व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल आणि आगामी विधान परिषद निवडणुकांवर सविस्तर चर्चा झाली, मात्र याच बैठकीत पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादीला मिळत नसल्याबद्दल उघडपणे खंत व्यक्त केली. अजित पवार हयात असताना अर्थखाते त्यांच्याकडेच असल्याने त्याच न्यायाने हे खाते आताही राष्ट्रवादीलाच मिळावे अशी पक्षाची रास्त अपेक्षा होती. मात्र, वारंवार मागणी करूनही भाजपकडून अर्थखाते दिले जात नसल्याने सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकांनी घेतलेल्या काही निर्णयांवरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी आधीपासूनच नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यात आजच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले होते. बैठकीतच गोंधळाची परिस्थिती आजच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच, पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे मुंबईत असूनही या बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पटेल यांच्या गैरहजेरीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच, प्रत्यक्ष बैठकीतही मोठा गोंधळ उडाल्याचे वृत्त समोर आले आहे. बैठकीदरम्यान ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यावरून तटकरे आणि छगन भुजबळ या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये भर बैठकीतच जोरदार खडाजंगी झाली. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचेच दिसून येत आहे. पटेल आणि मी, आम्ही दोघेच टीकेचे धनी का?- सुनील तटकरे या बैठकीत बोलताना ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दांत खंत व्यक्त केली की, आपल्यावर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर, तसेच पक्षावर टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा स्वतः नेतृत्व आमच्या समर्थनासाठी पुढे येत नाही. अजितदादांच्या निधनानंतर आम्ही दोघेच पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असताना आम्हीच टीकेचे धनी का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी मात्र आक्षेप घेतला आणि जे झाले ते झाले, ते सोडून द्या व आता पुढे जाऊया, असा सल्ला तटकरेंना दिला. याच मुद्द्यावरून या दोन नेत्यांमध्ये भर बैठकीत खडाजंगी झाल्याचे म्हटले जात आहे. विशेष बाब म्हणजे, तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. कोणताही वाद झालेला नाही- छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर सांगितले की, कोणताही वाद झालेला नाही. आमच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू होती तेव्हा आम्हाला समितीच्या बैठकीसाठी देखील फोन येत होते. काहीतरी कारण असेल. काही खडाजंगी अजिबात झालेली नाही, आम्हाला या बैठकीसाठी सारखे फोन येत होते. त्यामुळे मी मुद्द्याचे पटकन बोला असे म्हणालो, कुठलाही वाद झाला नाही. कुठलाही एकला चलोचा नारा कोणीही दिलेला नाही. कुठेही फुटलेले नाही आमची शक्ती तशीच आहे. सगळ्या आमदारांना सांगितले की आम्ही सगळे एक आहोत, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या पदाबाबत सध्या पक्षात संभ्रमाची स्थिती असून, देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या पक्षाच्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला ते गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षात ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याची भावना अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा कारभार सुरू झाला असला तरी, पक्षात ज्येष्ठ नेत्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची तीव्र भावना दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्व अंतर्गत घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये मोठी चलबिचल सुरू असून, याच अस्वस्थतेतून मध्यंतरी सुनील तटकरे यांच्यासह काही आमदारांनी थेट शरद पवार यांची भेट घेतल्याने पक्षात सध्या एकंदर गोंधळाचे आणि अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Source link
अर्थखाते मिळत नसल्याने सुनेत्रा पवार नाराज:राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली खंत; मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेलांची गैरहजरी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























