Homeमहाराष्ट्रShould we do Panchnama of Dhekals?, Agriculture Minister Kokate is in controversy...

Should we do Panchnama of Dhekals?, Agriculture Minister Kokate is in controversy again with a viral video from Sinnar | ढेकळांचे पंचनामे करायचे का?: सिन्नरमधील व्हायरल व्हिडिओने कृषिमंत्री कोकाटे पुन्हा वादात – Nashik News

सिन्नरमध्ये नुकसान पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा शेतकऱ्यांसोबतचा संवाद शुक्रवारी चर्चेत आला. ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा सवाल कृषिमंत्रीच शेतकऱ्यांना विचारत असल्याची ही व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.

?

सिन्नरमध्ये नुकसानीच्या पाहणीवेळी शेतकऱ्यांनी त्यांना अधिकारी केवळ उभ्या पिकांचे पंचनामे करायचे असल्याचे सांगत असल्याकडे लक्ष वेधले. या वेळी हार्वेस्टिंग केलेल्या पिकांचे पंचनामे कसे करायचे, शेतामध्ये पिकेच नसतील तर ढेकळांचे पंचनामे करायचे काय, असा सवाल कोकाटे यांनी विचारला. हार्वेस्टिंग करून घरात अथवा सुरक्षित जागेत साठवलेल्या शेतीमालाचे पंचनामे नियमात बसत नाही. मात्र शेतात पडून असलेल्या शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

यापूर्वी पवारांनी टोचले होते कान

आपल्या स्पष्टवक्ते स्वभावामुळे कोकाटे यांनी मंत्रिपद स्वीकारल्यापासून अनेक वाद अंगावर ओढवून घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः कोकाटे यांचे कान टोचल्याची चर्चा मागच्या काळात रंगली होती.

माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ : कोकाटे

छत्रपती संभाजीनगर| ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्र्यांनी यूटर्न घेतला. माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला. जिथे फळपिके नाहीत तिथे पंचनामा काय करणार, असे मला म्हणायचे हो. शुक्रवारी प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादासाठी ॲड. माणिकराव कोकाटे छत्रपती संभाजीनगरात आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिक-सिन्नर येथे केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावर सुधारणा करत असे जिथे फळपिके, मसाला पिकांचे नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ढोल-ताशा परंपरेच्या संवर्धनासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक:परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांचे मत

0
ढोल-ताशा वादनाची परंपरा आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तरच अधिकाधिक युवकांना या...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

व्हिएतनाममध्ये 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर बोट-कॅप्टनला अटक:कंपनीच्या रिवॉर्ड ट्रिपवर पर्यटक गेले होते; कुटुंबांना टीव्हीवरून बातमी...

0
व्हिएतनाममध्ये शनिवारी पर्यटकांची स्पीडबोट उलटल्याने 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर स्पीडबोट कॅप्टनला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार,...
spot_img

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

भारतातील महागाईचा दर जूनमध्ये ४.३८ टक्क्यांवर; अन्नाच्या किमती वाढतात

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशातील किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. जूनमध्ये ती वाढून 4.38% वर पोहोचली आहे, जी मे महिन्यात 3.93% होती....

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...
error: Content is protected !!