नवरात्रारंभ

चंडीविधान

     नवरात्रीच्या काळात श्री सप्तशतीचा पाठ केला जातो आणि शेवटी हवन केले जाते. यालाच चंडीविधान असे म्हणतात. याविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.

चंडीविधानचा अर्थ –  चंडी हे श्री दुर्गादेवी हिचे एक नाव आहे. मार्कंडेयपुराणात चंडीदेवीचे माहात्म्य सांगितले असून त्यात  तिच्या अवतारांचे आणि पराक्रमांचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्यातील जवळजवळ सातशे श्लोक एकत्र घेऊन ‘श्री सप्तशती’ नावाचा एक ग्रंथ देवीच्या उपासनेसाठी निराळा काढलेला आहे. ‘सुख, लाभ, जय इत्यादी अनेक कामनांच्या पूर्तीसाठी या सप्तशतीचा पाठ करावा’, असे सांगितले आहे. हा पाठ विशेषतः आश्विनातील नवरात्रीत करतात. काही घराण्यांत तसा कुलाचारही असतो. पाठ केल्यानंतर हवनही करायचे असते. या सगळ्याला मिळून ‘चंडीविधान’ असे म्हणतात.

चंडीविधानचे प्रकार – ( १ )नवचंडी – नऊ दिवस प्रतिदिन सप्तशतीचा पाठ आणि त्याच्या दशांशाने हवन करतात, त्याला नवचंडी म्हणतात. अनुष्ठानाच्या अंगभूत म्हणून नऊ दिवस एका कुमारीची पूजा करतात किंवा पहिल्या दिवशी एक, दुसर्‍या दिवशी दोन अशा वाढत्या क्रमाने कुमारींची पूजा करतात.

(२) शतचंडी – या विधानात सप्तशतीचे शंभर पाठ करतात. पाठाच्या आद्यंती नवार्ण मंत्राचा शंभर-शंभर जप करतात. अशा प्रकारे केलेल्या पाठाला ‘संपुटित पाठ’ असे म्हणतात. पहिल्या दिवशी एक, दुसर्‍या दिवशी दोन, तिसर्‍या दिवशी तीन आणि चौथ्या दिवशी चार अशा चढत्या क्रमाने दहा ब्राह्मणांनी पाठ केले म्हणजे शंभर चंडीपाठ पुरे होतात. ते पुरे झाल्यावर पाचव्या दिवशी दशांश हवन करतात.

(३) सहस्रचंडी  – राज्यनाश, महाउत्पात, महाभय, महामारी, शत्रूभय, रोगभय इत्यादी संकटांचा निरास होण्यासाठी सहस्रचंडीचे विधान करतात. यात सप्तशतीचे एक सहस्र पाठ करायचे असतात. त्यासाठी शंभर ब्राह्मण बोलावतात.

(४)लक्षचंडी – सप्तशतीचे एक लक्ष पाठ आणि त्या अनुषंगाने इतर विधी, याला लक्षचंडी म्हणतात.

विविध  पद्धती –  श्री दुर्गासप्तशतीचे उपासक त्याचे सुलटे, उलटे, सपल्लव, संपुट अशा पद्धतींचे पाठ करतात. विशिष्ट कामनेसाठी विशिष्ट प्रकारचा पाठ करतात

इच्छेनुसार  प्रार्थना –  श्री सप्तशतीमध्ये पुढे दिलेल्या काही श्लोकांसारखे विशिष्ट कामनापूर्तीसाठी विशिष्ट श्लोक आहेत.

अ. चांगली  पत्नी मिळण्यासाठी – पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम् । तारिणीं  दुर्गसंसारात्  सागरस्य  कुलोद्भवाम्  ।।

अर्थ : मला मनोरमा, माझ्या इच्छेनुसार वागणारी, कठीण अशा या संसारसागरातून तारणारी आणि चांगल्या कुळात जन्मलेली अशी पत्नी मिळू दे.

आ. सर्वांगीण  कल्याणाकरिता – सर्वमङ्गलमाङ्गल्ये  शिवे सर्वार्थसाधिके  । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ।।

अर्थ : सर्व मंगलवस्तूंतील मांगल्यरूप अशा देवी, कल्याणदायिनी देवी, सर्व पुरुषार्थ साधविणार्‍या देवी, शरणागतांचे रक्षण करणार्‍या देवी, त्रिनयने, गौरी, नारायणी तुला नमस्कार असो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शक्ती’

संकलक: प्रा. विठ्ठल जाधव , संपर्क क्रमांक : ७०३८७१३८८३

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!