Homeमहाराष्ट्रRangat-Sangat Pratishthan and Ame Ekpatri present Vandan Ram Nagarkar Award | रंगत-संगत...

Rangat-Sangat Pratishthan and Ame Ekpatri present Vandan Ram Nagarkar Award | रंगत-संगत प्रतिष्ठान आणि आम्ही एकपात्रीतर्फे वंदन राम नगरकर पुरस्कार: नितीन कुलकर्णी यांना पहिला पुरस्कार, विचारधारा रसिकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे – Pune News

पुरस्कारातून कलाकाराला उत्साह आणि प्रेरणा मिळते. जो ‌‘पुरे साकार‌’ करतो त्याला पुरस्कार दिला जातो. मनोरंजन व विचारधारा रसिकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य आहे. कलाकाराच्या सादरीकरणातून त्याचे विचार रसिकांच्या मनापर्यंत गेले की, रसिक उत्

?

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि आम्ही एकपात्री यांच्या वतीने पहिल्या वंदन राम नगरकर स्मृती पुरस्काराने नितीन कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी बोलत होते. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ रंगकर्मी बण्डा जोशी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, आम्ही एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा खरे मंचावर होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, मानचिन्ह, ग्रंथ आणि पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बण्डा जोशी आणि नितीन कुलकर्णी यांनी ‌‘हास्यवंदन‌’ हा कार्यक्रम सादर केला. त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सादरीकरण करताना विनोदी कलाकार माळेमध्ये फुले ओवल्याप्रमाणे प्रसंग ओवत जातो आणि सादरीकरण अधिक मनोरंजक करतो, असे सांगून नितीन कुलकर्णी म्हणाले, कलाकराला रसिकांची रंगत-संगत मिळत गेली की कलाकाराचा कार्यक्रम बहरत जातो. त्याला रंगदेवतेची प्रेरणा असणे आवश्यक असते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बण्डा जोशी म्हणाले, माणूस खळखळून हसतो तेव्हा तो सुंदर दिसतो आणि हा सुंदर माणूस पाहण्याचे भाग्य आम्हा हास्य कलाकारांना लाभते. रसिकांना हसवायचे काम जरी आम्ही कलाकार सातत्याने करत असलो तरी आम्हा कलाकारांना या विषयी गंभीरपणे अभ्यास करावा लागतो. सगळ्या कलांचा संगम असलेला, विनोदाची पातळी सांभाळणारा एकपात्री कलाकार उत्तम ठरतो.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, वंदन राम नगरकर हे फक्त कलावंत नव्हे तर उत्तम माणूसही होते. त्यांनी आपल्या कलेची समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय दोन्ही संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. सकारात्मक काम करण्याच्या ओढीने आम्ही सतत कार्यरत आहोत.

डॉ. वैजयंती नगरकर म्हणाल्या, हास्य कलाकार आपल्या सादरीकरणातून रसिकांच्या मेंदूमध्ये अशी रासायनिक प्रक्रिया निर्माण करतो की ज्यातून त्याचे मानसिक आरोग्य जपण्यास मदत होते. वंदन नगरकर यांचे पहिले प्रेम हे एकपात्री कलाच होते. त्यांनी रुजविलेले आम्ही एकपात्री संस्थेचे बीज आणि त्यातून निर्माण झालेला वृक्ष त्यांच्या पश्चात इतर कलाकार उत्तमरित्या सांभाळत आहेत याचा आनंद आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अनंत अंबानींनी धीरेंद्र शास्त्रींचा हात पकडून ओढले, व्हिडिओ:बागेश्वर धाममध्ये म्हणाले- तुम्ही यायला सांगितले होते,...

0
देशातील प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी गुरुवारी संध्याकाळी विशेष विमानाने बागेश्वर धाम येथे पोहोचले. फोटो सेशनदरम्यान एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. फोटो काढताना अनंत...

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’चे आयोजन

0
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध...

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे;...

0
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या...

शुक्र का राशिफल, मराठीत शुक्र सिंह राशिफळ, सिंह राशीत शुक्र, राशिचक्र १२ राशी,

0
13 तासांपूर्वीलिंक कॉपी करा४ जुलै रोजी वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र राशी बदलत आहे. हा ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि ४...
spot_img

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...
error: Content is protected !!