Homeपुणे ग्रामीणवेल्हे (राजगड) येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

वेल्हे (राजगड) येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे ग्रामीण (वेल्हे) – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार श्री. शंकरभाऊ मांडेकर यांच्या पुढाकाराने वेल्हे तालुक्यातील अनुशंकर मंगल कार्यालय, आंबी फाटा येथे पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या उपक्रमात १४०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेतला.

मतदारसंघातील नागरिकांच्या थेट भेटी घेत, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे तात्काळ निरसन व्हावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी सांगितले. उपक्रमादरम्यान अनेक नागरिकांनी विविध समस्यांविषयी मांडणी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्वरित कारवाईचे निर्देश देण्यात आले. यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

उपक्रमात जन्म, जात, उत्पन्न, रहिवासी इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच वृद्धापकाळ, अपंगत्व, शिष्यवृत्ती, रेशनकार्ड, किसान सन्मान योजना, पीएम आवास योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, जल जीवन मिशन अशा अनेक योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यात आला. या माध्यमातून नागरिकांचे अनेक प्रशासकीय कामकाज सोपे झाले.

या कार्यक्रमाला आमदार श्री. शंकरभाऊ मांडेकर, भोर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, वेल्हे उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे, वेल्हे तहसीलदार श्रीनिवास ढोणे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण राऊत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल नलावडे, कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर, अनंता दारवटकर, किर्तीताई देशमुख, सुनील जागडे, तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

हा उपक्रम म्हणजे शासनाची सेवा थेट गावकऱ्यांच्या दारी आणण्याचे प्रभावी उदाहरण ठरले. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!