पुणे ग्रामीण: पुणे जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी लवळे ग्रामपंचायत अधिकारी तथा पंचायत समिती मुळशी येथील श्री विठ्ठलराव साकोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील सर्व १७ तालुक्यांतील संचालकांनी एकमुखाने त्यांची निवड केली.
या निवडीनंतर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आणि सहकारी यांनी साकोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रिया निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती एच. ए. पाटील मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली.
या प्रसंगी घटना दुरुस्ती समितीचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक श्री अनिलजी कुंभार, जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष श्री अमोल घोळवे, कार्याध्यक्ष श्री संदीप ढवाळ, संचालक श्रीकांत वाव्हळ, संतोष भोसले, संतोष निंबाळकर, तुकाराम शिंदे, महेंद्र बेंगारे, पद्माकर डोंबाळे, देवदत्त सांडभोर, बाळासाहेब मतकर, शरद ढोले, मदन शेलार, गंगाधर देशमुख तसेच व्हाईस चेअरमन सौ. प्रज्ञा चव्हाण आणि सेक्रेटरी श्री विलास बडदे उपस्थित होते.

तसेच शिरूर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री राजाराम रासकर, मुळशी तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री तुळशीराम रायकर, उपाध्यक्ष श्री प्रशांत सूर्यवंशी, कायदे सल्लागार श्री हनुमंत भंडलकर, सहसचिव श्री स्वप्निल रासकर, कृषी पदव्युत्तर ग्रामसेवक तांत्रिक संघटनेचे सचिव श्री अनिल बोराटे व मित्र श्री जगन्नाथ भोंग यांचीही उपस्थिती होती.
विठ्ठलराव साकोरे यांच्या नेतृत्वात संस्थेची वाटचाल अधिक प्रगत आणि ग्रामसेवक हितासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

































