Homeदेश-विदेशPakistan fears attack from sea; Security at Gwadar port, Pakistani minister's post...

Pakistan fears attack from sea; Security at Gwadar port, Pakistani minister’s post at 2:30 am – We are afraid | पहलगाम हल्ला: पाकला समुद्रमार्गे हल्ल्याची भीती; ग्वादर बंदराला सुरक्षा, मध्यरात्री अडीच वाजता पाकिस्तानी मंत्र्याची पोस्ट-आम्हाला भीती वाटतेय


  • मराठी बातम्या
  • आंतरराष्ट्रीय
  • पाकिस्तानला समुद्राच्या हल्ल्याची भीती वाटते; पाकिस्तानी मंत्र्यांच्या पदाच्या अडीच वाजता ग्वादार बंदरातील सुरक्षा आम्हाला भीती वाटते

इस्लामाबाद/ नवी ​दिल्ली4 तासांपूर्वी

  • कॉपी दुवा

पहलगाम हल्ल्यानंतर पाकची झोप उडाली आहे. पाकने हल्ल्याच्या भीतीने ग्वादर बंदराची सुरक्षा वाढवली. कराची हवाई तळावर २५ चीननिर्मित जे १० सी आणि जेएफ १७ लढाऊ विमाने तैनात केली. ही विमाने हल्ल्याच्या स्थितीत काही मिनिटांत ग्वादर बंदरावर पोहोचू शकतात. सूत्रांनुसार, पाकला भारत समुद्रमार्गे मोठा हल्ला करण्याची भीती सतावत आहे. अमेरिकेकडून मिळालेले एफ १६ कॉम्बॅट सज्ज ठेवले आहेत.

दरम्यान, उत्तर व उत्तर पूर्व भागात लष्कर आणि हवाई दलाच्या हल्ल्याच्या शक्यतेने घाबरलेल्या पाकने बलुचिस्तानातील पासनी, गिलगिट बाल्टिस्तानच्या स्कार्दू आणि खैबर पख्तूनख्वाहचे स्वाॅट एअरबेस सक्रिय केले. येथून विमानांची उड्डाणे सुरू झाली. कराची-लाहोरहून स्कार्दूसाठी नागरी उड्डाणे रद्द केली आहेत. पाकचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी रात्री सुमारे अडीच वाजता सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला की, आम्हाला भीती आहे की, भारत २४ ते ३६ तासांत मोठा हल्ला करेल.

राष्ट्रीय सुरक्षा बोर्डाचे चेअरमन बनले जोशी

आलोक जोशी यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डाचे चेअरमन बनवण्यात आले. जोशी रॉचे प्रमख राहिले आहेत. माजी एअर मार्शल पीएम सिन्हा, माजी ले. जनरल एके सिंह व माजी रिअर ॲडमिरल मोंटी खन्ना सदस्य असतील.

पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद

भारताने पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले. २३ मे पर्यंत त्यांचे कोणतेही विमान भारतीय हवाई हद्दीतून जाऊ शकणार नाही. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी बुधवारी दुपारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली. तसेच राजकीय बाबींवरील मंत्रिमंडळ समिती आणि आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकाही घेतल्या. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी म्हणाले की, पहलगामच्या गुन्हेगारांना याची किंमत मोजावी लागेल, जेणेकरून कोणीही पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही.

भारताचा इशारा: गोळीबार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील

हिंदी महासागरात बुधवारी भारतीय नौदलाच्या महाकाय नौका गस्त घालताना.भारतीय नौदल हिंदी महासागराचे सुरक्षा कवच आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकला समुद्रमार्गे हल्ल्याची भीती वाटत आहे. भारताकडे दोन विमानवाहक पोत आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत आहेत. दोन्ही स्वदेशी तंत्रज्ञानाची निर्मिती (पाकिस्तानकडे एकही विमानवाहक पोत नाही). भारताने २६ एप्रिलला आयएनएस सुरत ते ७० किमीपर्यंत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे.

जलशक्ती… हिंदी महासागरात भारतीय नौदल अचूक-अव्वल

भारतीय सैन्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला. हॉटलाइनवर भारताने म्हटले की, पाकिस्तानने गोळीबार थांबवावा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील. पहलगाम हल्ल्यानंतर पाकने आतापर्यंत नियंत्रण रेषेवर सहा वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. वाचा. देश-विदेश



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!