Homeपुणे / पिंपरी-चिंचवडपावसामुळे नाशिकमध्ये झाडांची पडझड, अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत

पावसामुळे नाशिकमध्ये झाडांची पडझड, अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत


नाशिक: रविवारी दुपारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने शहर आणि परिसराला झोडपले. जवळपास एक ते दीड तास पाऊस झाला. वेगवेगळ्या भागात सुमारे २५ हून अधिक झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी रिक्षा, मोटारींवर झाडे कोसळली. सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे आले. अनेक भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला.

आठवडाभरापासून ग्रामीण भागासह शहरात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. शुक्रवारी रात्री पावसाने शहरात दाणादाण उडवली होती. रविवारी दुपारी पुन्हा काहीअंशी तशीच स्थिती निर्माण झाली. सकाळी सूर्यदर्शन झाले होते. दुपारी वातावरणात बदल होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळात रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. सुमारे दीड तास पावसाचा जोर कायम राहिला. या काळात अनेक भागात झाडांची पडझड झाली. सिटी सेंटर माॅलकडे जाणाऱ्या एबीबी चौकात रिक्षावर झाड कोसळले तर, सिडकोतील कोकण भवन परिसरात मोटारीवर झाड कोसळले. यात कोणी जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.

संभाजी चौक, सावरकरनगर, सिडकोतील पाटीलनगर, उंटवाडी, शरणपूर रस्त्यावरील बारा बंगला, शरणपूर रस्ता गंगापूर पोलीस ठाण्यासमोर, समर्थनगर, कामटवाडा रोड, शरदचंद्र मार्केट यार्ड, साईआनंद अपार्टमेंट, हिरावाडी रोड, त्रिमूर्ती चौक, मोरे मळा, बुरकुले मळा, पाईपलाईन रोड, सातपूर कॉलनी, एक्स्लो पॉइंट अशा सुमारे २५ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

पाटीलनगर भागात अण्णासाहेब पाटील शाळेलगतच्या रस्त्यावर निलगिरीचे झाड कोसळले. अशा घटनांनी काही भागात वाहतुकीत अडथळे आले. पडलेली झाडे हटविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. फांद्या आणि झाडे पडण्याच्या सत्राने वीज पुरवठ्यात अडथळे कायम राहिले. अनेक भागात दोन, तीन तास वीज पुरवठा खंडित झाला होता. सखल भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले, वाहनधारकांना या भागातून मार्गक्रमण करणे अवघड झाले होते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आषाढ महिना सुरू:देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू, 29 जुलैला गुरुपौर्णिमा; जाणून घ्या आषाढ महिन्याशी संबंधित...

0
आज (मंगळवार, 30 जून) पासून आषाढ महिना सुरू झाला आहे. हा हिंदू पंचांगातील चौथा महिना आहे. बुधवार, 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेसोबत आषाढ संपेल...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

जालन्यात पोलिसांचा ‘अँटी-ड्रग्ज’ पॅटर्न:3 हजार नशेच्या गोळ्या जप्त, महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगार न करता पालकांना...

0
जालना शहरात नशेच्या बटण गोळ्या ‎विक्री व बाळगणाऱ्यांवर कारवाया ‎केल्या जात आहे. वर्षभरात 3 हजार ‎‎नशेच्या गोळ्या जप्त करून 16 ‎आरोपी निष्पन्न केले.‎दहशतवादविरोधी...

इंडिगो फ्लाइटमध्ये मूल बेशुद्ध; सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग

0
सुरत6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E-7018 विमानामध्ये सोमवारी संध्याकाळी 3 वर्षांचा एक मुलगा बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती बिघडल्याने वैमानिकाने वैद्यकीय आणीबाणी...
spot_img

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....
error: Content is protected !!