देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यात आता विरोधी पक्षांनी देखील सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात आंदोलन सुरू केले आहे. तसेच मुंबईत देखील शिवसेना ठाकरे गटकडून व मनसेकडून मोर्चा काढण्यात येत आहे. या प्रकरणावर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले, जंतर मंतरवर लहान लहान मुलींचे कपडे फाडले, त्यांच्या प्रायवेट पार्टवर इजा करण्याच्या पोलिसांनी प्रयत्न केला. मुलांना बेदम मारहाण केली. हे मुलं कुठल्याही राजकीय पक्षाचे नव्हते, ते त्यांची लढाई लढण्यासाठी तिथे आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने पुढे एक पाऊल जाऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा करून घ्यायला पाहिजे होता. एक परीक्षेसाठी जवळपास 10 लाख रुपये खर्च करावा लागतो आणि तो पेपर लीक झाला आणि त्यामुळे अनेक मुलांचे भविष्य खराब झाले आणि त्यातून अनेकांनी आत्महत्या केली. नागपूरमध्ये देखील आत्महत्या केल्या पण ते दाबण्याचे प्रयत्न करण्यात आले. हे मुलं देशाचे भविष्य आहे आणि या देशाच्या भविष्याबद्दल जो राग या मस्तावलेल्या मोदी सरकारमध्ये पाहायला मिळाला आणि त्या दृष्टीकतून चित्र आपण देशभरात पाहतो आहोत. आपण 75 वी लोकशाही साजरी करतोय. जंतर मंतरवर आपण पाहिले की या तरुणांनी राग व्यक्त केला आहे. तिथे राहुल गांधी का गेले नाही, असा प्रश्न विचारला जातोय, त्याला राजकीय रंग द्यायचा नव्हता म्हणून ते तिथे गेले नव्हते. आज देशभरात आपण शांतते आंदोलन करत आहोत. कारण आम्ही गोडसे नाही तर महात्मा गांधींच्या विचारांसोबत आहोत. आम्ही या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी कॅन्डल मार्च काढत आहोत. 56 इंच छाती कुठे गेली? पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे जर आपण 2014 च्या पूर्वीचे भाषण ऐकले तर त्यात पेपरफुटीचा सुद्धा मुद्दा होता. मग जवळपास 3 वेळचे पंतप्रधान आहात, तर सुधारणा का नाही केली? हे आंदोलन सुरू असताना लोकसभेतून पळून जातात, त्या मुलांसाठी त्या मैदानात का नाही उतरलात? 56 इंच छाती तेव्हा कुठे गेली? कायदा बदलणार आहोत असे ते व्हिडिओमधून सांगतात, लोकसभेत का नाही बोलू शकले? पळकूटा प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला आहे.
Source link
’56 इंचाची छाती कुठे गेली? देशाने पळकुटा पंतप्रधान पाहिला’:नीट पेपरफुटीवरून नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























