Homeमहाराष्ट्रजायकवाडी धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ:53 टक्के साठा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना सिंचनाची आशा

जायकवाडी धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ:53 टक्के साठा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना सिंचनाची आशा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी रात्री धरणात ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. यामुळे रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासांत १९६ दलघमी पाणीसाठा वाढला. रविवारी सकाळी ४८ टक्के असलेला पाणीसाठा रात्री १० वाजेपर्यंत ५३.४१ टक्क्यांवर पोहोचला. सध्या जायकवाडी धरणात ११५९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, एकूण पाणीसाठा १८९७ दलघमी इतका झाला आहे. मराठवाड्यात सध्या जायकवाडी वगळता इतर कुठल्याही मोठ्या धरणात पाणीसाठा आलेला नाही, त्यामुळे या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष जायकवाडीकडे लागले आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, जायकवाडीतील वाढत्या पाणीसाठ्यामुळे कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जलतज्ज्ञ जे.एन. हिरे यांच्या मते, या पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगाम यशस्वीपणे राबवता येईल. हिरे यांनी सांगितले की, जायकवाडी धरण ५० टक्के भरल्यास किमान तीन पाणीपाळ्या देता येतील. तसेच, खरीप हंगामात पुन्हा पाऊस न झाल्यास खरिपासाठी एक पाणीपाळी द्यावी लागू शकते. या साठ्यामुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याची आणि औद्योगिक वापराची सोय होणार आहे. धरण १०० टक्के भरावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जायकवाडीच्या वरच्या धरणांमध्येही चांगला पाणीसाठा झाल्याने पुढील काही दिवसांत जायकवाडीचा पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दारणा धरण ८८ टक्के, भाम, भामा-आसखेड, वालदेवी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. गंगापूर धरणात ८७ टक्के, कश्यपी ९२ टक्के, तर भंडारदरा ९० टक्के आणि निळवंडे ७९ टक्के भरले आहे. यामुळे जोरदार पाऊस झाल्यास जायकवाडीत आणखी पाणी येण्याची शक्यता आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!