Homeमहाराष्ट्रहे शक्य आहे का की भाजपाने पुणे नगरपालिका निवडणुका स्वतःच लढतील

हे शक्य आहे का की भाजपाने पुणे नगरपालिका निवडणुका स्वतःच लढतील


पुणे : विधानसभा निवडणुकीतील यशानंतर पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपचे नगरसेवक निवडून आलेल्या १०५ जागा सोडून अन्य जागांवर चर्चा करण्याची भूमिका शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढल्यास त्याला पुणे ‘अपवाद’ ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चार महिन्यांत घ्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी मुक्कामी आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची कामगिरी, निवडणुकीसंदर्भातील पक्षाची तयारी यासंदर्भात फडणवीस यांनी आढावा घेतला. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

निवडून आलेल्या १०५ जागा सोडून अन्य जागांवर चर्चा करावी, अशी भूमिका घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका बैठकीत मांडली.‘राज्यात सत्ताधारी असलेल्या तिन्ही पक्षांनी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढाव्यात, असा प्रयत्न आहे. मात्र, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीनंतर पुणे महापालिकेचा महापौर भाजपचाच असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटल्याने स्वबळाच्या चाचपणीला आणखीनच जोर मिळाला आहे.

हेही वाचा

मुंबईपाठोपाठ पुणे ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी महापालिका आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकहाती सत्ता मिळाली होती. या निवडणुकीत भाजपचे शंभर नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या (ठाकरे) पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपने एकूण १०५ जागांवर दावा केला आहे. या जागा सोडून अन्य जागांबाबत बोलणी करावी, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अप्रत्यक्ष सहमती दर्शविली आहे.

शहर आणि जिल्ह्याचा विचार केला, तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला २१ पैकी १९ जागांवर विजय मिळविता आला आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. महायुती म्हणून महापालिकेची निवडणूक लढवायची झाल्यास अनेक इच्छुक असल्याने बंडखोरी होण्याचीही भीती आहे. त्यामुळे निवडणूक महायुती म्हणून नको तर स्वबळावर लढविण्यात यावी, अशी भूमिका काही भाजप पदाधिकाऱ्यांची आहे.

शहरात भाजपचे सहा आमदार, त्यांपैकी एक राज्य मंत्रिमंडळात मंत्री, दोन खासदारांपैकी एक केंद्रीय राज्यमंत्री, एक माजी खासदार असे बळ आहे. त्यामुळे पुणे भाजपसाठी महत्त्वाचे शहर ठरले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचेही पुण्याकडे सातत्याने लक्ष आहे. पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व राखण्यासाठी पुणे महापालिकेतील सत्ताही महत्त्वाची ठरणार आहे. महायुती म्हणून निवडणूक लढविण्याच्या मर्यादा लक्षात घेता निवडणुकीनंतर काही जागा कमी पडल्यास महायुतीमधील मित्रपक्षांना बरोबर घेता येईल, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीत चारचा प्रभाग?

आगामी निवडणूक सन २०१७ च्या चार नगरसेवकांचा प्रभाग या पद्धतीनेच होणार असल्याचे संकेत मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. चार नगरसेवकांचा एक प्रभाग यानुसारच तयारी करण्याची सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली असल्याचे सांगण्यात आले.

महापालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक झाली. शहरात भाजपच्या १०५ जागा आहेत. त्या सर्व लढवल्या जातील. निवडणूक स्वबळावर की महायुती म्हणून लढवायची, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जीवनातील समस्यांमुळे एक व्यक्ती निराश झाला होता:प्रेरक कथा: दुःखी व्यक्ती संतांकडे पोहोचला, जाणून घ्या...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे, एक व्यक्ती आयुष्यातील अडचणींमुळे निराश झाला होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या...

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत

0
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ...

आग्रा-मुंबई महामार्गावर 7 तासांपासून 25 किमीची वाहतूक कोंडी, व्हिडिओ:बस-ट्रकमध्ये अडकले लोक; भेरू घाटापासून मानपूरपर्यंत...

0
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यंतही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही....
spot_img

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...
error: Content is protected !!