Homeपुणे / पिंपरी-चिंचवड१५ नोव्हेंबरला आळंदी येथे वारकरी महाअधिवेशन !

१५ नोव्हेंबरला आळंदी येथे वारकरी महाअधिवेशन !

नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण, राष्ट्र रक्षणार्थ तसेच वारकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकरीता १५ नोव्हेंबरला आळंदी येथे वारकरी महाअधिवेशन !

पुणे – वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा हि महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतकांपासून वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृती रक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म,संस्कृती आणि राष्ट्रहितासाठी वारकरी समाज नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. हीच जाज्वल्य भक्ती,राष्ट्रनिष्ठा यातून समस्त वारकरी यांचे संघटनातून महत्वाच्या मागण्या शासनाकडे करण्याकरीता १५ नोव्हेंबर या दिवशी १९ व्या वारकरी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समिती,राष्ट्रीय वारकरी परिषद,वारकरी संघटना आणि संप्रदाय,सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र गोदावरी धाम,बेट सरला यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे अधिवेशन दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठ,आळंदी (देवाची), पुणे येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प.मारुती शास्त्री तुणतुणे यांनी, पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री.नागेश जोशी, रणरागिणी शाखेच्या कु क्रांती पेटकर, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प.बापू महाराज रावकर, ह.भ.प. रामचंद्र पेनोरे महाराज ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.     

      या संदर्भात ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे म्हणाले, ‘‘गेली १८ वर्षे सातत्याने हे अधिवेशन घेण्यात येत असून वारकर्‍यांचे विविध प्रश्‍न सातत्याने मांडून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा घेते. यंदाही वारकर्‍यांच्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे.’’  

     ह.भ.प. बापू महाराज रावकर म्हणाले कि, ‘‘या अधिवेशनामध्ये महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज, पिठाधीश,बेट सरला, श्री क्षेत्र गोदावरी धाम आणि जेष्ठ वारकरी संत,धर्मसंस्थापक यांची वंदनीय उपस्थिती असणार आहे.या परिषदेसाठी श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती यांसह अन्य मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. 

या अधिवेशनाला समस्त वारकरी तसेच हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी ह.भ.प. बापू महाराज रावकर -( 9975572684 )यावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!