Homeपुणे / पिंपरी-चिंचवडकुतुहल: पौष्टिक मध्ययाच स्वरोप - मराठी बातम्या | मायक्रोबियलवर परिणाम करणार्‍या सूक्ष्मजीव...

कुतुहल: पौष्टिक मध्ययाच स्वरोप – मराठी बातम्या | मायक्रोबियलवर परिणाम करणार्‍या सूक्ष्मजीव वाढीच्या घटकांबद्दल तथ्य 70 वाढते


सूक्ष्मजंतूंची वाढ पोषण माध्यमांशिवाय अशक्य आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी शास्त्रज्ञ द्रवसूप (ब्रॉथ), बटाट्याचे काप, अंड्याचा गोळा अशा नैसर्गिक घन आधारकांचा वापर करत असत. मात्र ही माध्यमे अपारदर्शक, तापमान-संवेदनशील आणि जीवाणूंच्या विघटनास सहज बळी पडणारी होती. ‘अगर’ या घटकाच्या समावेशामुळे तापमानाने न वितळणारे, पारदर्शक आणि जीवाणूंच्या विघटनास प्रतिरोधक असे घनमाध्यम उपलब्ध झाले. या क्रांतिकारक शोधामुळे सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रगतीला अभूतपूर्व गती मिळाली.

आज विविध भौतिकस्वरूपात तयार पोषण माध्यमे उपलब्ध असून, त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार व उद्दिष्टांनुसार त्यांचा वापर केला जातो.

निर्जल पावडरयुक्त माध्यमे – ही सर्वाधिक वापरली जाणारी पारंपरिक माध्यमे आहेत. आवश्यक घटक सूक्ष्म पावडर स्वरूपात संमिश्रित केलेले असतात. वापरताना पाण्यात विरघळवून निर्जंतुकीकरण करावे लागते. ही माध्यमे किफायतशीर व सर्वत्र उपलब्ध असली तरी त्यातून निर्माण होणाऱ्या बारीक धुळीमुळे अॅलर्जी होऊ शकते किंवा शिंका येण्याचाही धोका असतो. दीर्घ साठवणुकीत गुठळ्या तयार होणे आणि तळाचा भाग घट्ट होणे ही समस्या आढळते.

दाणेदार (ग्रॅन्युल) माध्यमे- पावडरयुक्त कणांना दाणेदार स्वरूप दिल्याने धूळ निर्मिती लक्षणीयरीत्या कमी होते, ज्यामुळे माध्यम हाताळणाऱ्याच्या आरोग्यास धोका निर्माण होत नाही. उत्कृष्ट प्रवाही प्रवृत्तीमुळे मापन करताना गुठळ्या होत नाहीत आणि घटकांचे समान मिश्रण प्रत्येक दाण्यात सुनिश्चित होते. त्यामुळे वाहतूक व साठवणुकीदरम्यान घटकविभेदन होत नाही आणि प्रत्येक बॅचमध्ये परिणाम पुनरावर्तनीय राहतात. साठवणकालदेखील तुलनेने अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा

कॅप्स्युल माध्यमे- अचूक मोजमापातील पूड जलविद्रधी कॅप्स्युल स्वरूपात उपलब्ध असते. आवश्यक तेवढ्या कॅप्स्युल पाण्यात टाकून निर्जंतुकीकरण केल्याने क्षणार्धात माध्यम तयार होते. यामुळे मापनातील त्रुटी, नासधूस टाळते आणि प्रक्रिया स्वच्छ व अचूक राहते. उदाहरणार्थ, एलबीब्रॉथ आता कॅप्स्युलरूपात उपलब्ध असून पारंपरिक पावडरमाध्यमाप्रमाणेच वाढीचे गुणधर्म दर्शवते.

तयार-उपयोगी माध्यमे – यात निर्जंतुकीकरण केलेला द्रव पिशव्या, बाटल्या किंवा आधीच ओतून तयार केलेल्या घनमाध्यम पेट्रीडिशेसमधून विक्रीस येतो. औषध-नियंत्रण चाचण्या, क्लिनिकल तपासण्या यांसारख्या कामांसाठी यामुळे वेळ व श्रमाची बचत होते. मात्र ही माध्यमे महागडी असतात आणि त्यांचा साठवणकाळ तुलनेने कमी असतो. त्यामुळे पूड किंवा ग्रॅन्युल माध्यमांचीच मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, फार्मा, बायोफार्मा, अन्नप्रक्रिया व जैवतंत्रज्ञान या नियमनाधीन उद्याोगांमध्ये तयार-उपयोगी माध्यमांचा वापर अधिक प्रमाणात होतो. औद्याोगिक स्तरावर आजही निर्जल पावडर माध्यमांचा वापर होतो, तर उच्च-प्रतीच्या विशिष्ट प्रक्रियांसाठी तयार निर्जंतूक द्रवमाध्यम व संहत पोषण माध्यम यांचा वापर हळूहळू वाढत आहे.

गिरीश महाजन डॉ

मराठी विज्ञान परिषद

ईमेल: कार्यालय@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!