मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर दोन महिन्यांत त्यांची कन्या वैभवी देशमुख हिने दुःखाचा डोंगर पेलत बारावीची परीक्षा दिली. आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वैभवीने ब
?
मुख्यमंत्र्यांनी पत्रात काय म्हटले?
अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस, तुझे अतिशय मनापासून अभिनंदन. मला याची जाणिव आहे की, तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडील स्व. संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण, तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप आज संपूर्ण महाराष्ट्र देतोय. 85.33 टक्के गुण संपादन करुन तू अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केला आहेस. तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. तू अशीच प्रगती करीत रहावी, भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठावेत, यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव सोबत आहेतच. तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव सोबत असेल. भावी वाटचालीसाठी तुला अनेकानेक शुभेच्छा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुख हिला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत वैभवी देशमुख हिचे अभिनंदन केले आहे. प्रचंड कटूतेचे अनुभव जरी तुझ्या वाट्याला आले असले तरीसुद्धा इथून पुढच्या आयुष्यात चांगुलपणाचा गोडवा तू जतन करशील, अशा शब्दांत अंधारे यांनी वैभवीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुषमा अंधारे यांची पोस्ट
प्रचंड संतुलित वातावरणामध्ये उत्कृष्ट आणि अतिउच्च प्रतीची खते वापरून प्रत्येक क्षण निगराणी करत जर एखाद्या कुंडीमध्ये गुलाबाचे टपोरे फुल फुलले तर त्याचे फारसे कौतुक वाटत नाही. मात्र ऊन वाऱ्याचा मारा सोसत, मातीतून अंकुरून वर येण्यासाठी आपल्याला कुठलाही आधार असणार नाही याची जाणीव असतानाही टरारून कोंभ जिद्दीने वर येतो तेव्हा खडकाळ माळरानावर उगवलेल्या साध्या गवताच्या पात्यावरही प्रेम करावसं वाटतं…
खरंतर 16 व 17 व वर्ष म्हणजे आयुष्याला आकार देणारे वर्ष. या वळणावर वळण सकारात्मक मिळालं तर आयुष्य वळणदार होतो वळण चुकलं तर मात्र आयुष्याचा वाळवण व्हायला वेळ लागत नाही… कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी आपला विवेक हरवता कामा नये. चांगुलपणावर असणारी निष्ठा आणि सात्विक मूल्य आपण जपली पाहिजे. हा संस्कार मागील सहा महिन्यांपासून ज्या वैभवीच्या ठाई आपण सगळ्यांनी बघितला. तिचा बारावीचा निकाल कौतुकास्पद आहे ..!
एकीकडे वडिलांची अत्यंत क्रूर हत्या.. दहशत.. राज्यभरातले आक्रोश मोर्चे जर आपल्या वडिलांसाठी निघत असतील तर आपण स्वतः लढण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे याचं आत्मभान आणि त्याच वेळेला वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांची जाण जपत वैभवीने बारावीची परीक्षा दिली. तिचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला लागला.
वैभवी खूप खूप अभिनंदन शुभेच्छा… मला खात्री आहे आयुष्यातल्या कुठल्याही कठीण प्रसंगांमध्ये तुझा विवेक हरवणार नाही… प्रचंड कटूतेचे अनुभव जरी तुझ्या वाट्याला आले असले तरीसुद्धा इथून पुढच्या आयुष्यात चांगुलपणाचा गोडवा तू जतन करशील… खूप खूप अभिनंदन…उंच उंच झेप घे.. तुझ्या झेपेच्या कवेत आकाश आहे… ! अशी पोस्ट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.





























