Homeमहाराष्ट्रबामुक्तो निषेध चेतावणी: पीएचडी घोटाळा, संशोधन अनुदान आणि भेदभाव समस्या

बामुक्तो निषेध चेतावणी: पीएचडी घोटाळा, संशोधन अनुदान आणि भेदभाव समस्या


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी-केंद्रित व न्याय्य धोरण स्वीकारून शैक्षणिक, संशोधन व प्राध्यापक हिताच्या प्रलंबित प्रश्नांचे त्वरित निराकरण करावे, या मागणीसाठी ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मह

.

संघटनेच्या वतीने मा. कुलगुरूंना विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. विद्यापीठातील पीएच.डी. घोटाळा, संशोधन अनुदान आणि भेदभावाचा मुद्दा ‘बामुक्टो’ने ऐरणीवर आणला आहे.

पीएच.डी. संदर्भात विद्यापीठाची भूमिका संशयास्पद?

विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष वेधताना बामुक्टोने पीएच.डी. संदर्भातील अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

  • पीएच.डी. संदर्भातील भरती प्रक्रिया ही बिंदूनामावलीनुसारच (Roaster) करण्यात यावी.
  • न्यायालयाने पीएच.डी. संदर्भात दिलेले निर्णय विद्यापीठाने तत्काळ लागू करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पीएच.डी. संदर्भात विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल गुलदस्त्यात न ठेवता तो विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात यावा. या अहवालावर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान १० दिवसांचा कालावधी देऊन त्या आक्षेपांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाविद्यालयीन प्राध्यापकांवर अन्याय व भेदभाव थांबवा!

विद्यापीठ कॅम्पस मधील प्राध्यापक आणि उप-केंद्रे किंवा संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापक यांच्यात विद्यापीठ प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

संशोधक मार्गदर्शक (गाईड) मान्यता

महाविद्यालयीन प्राध्यापकांना यापूर्वी देण्यात आलेली पीएच.डी. संशोधक मार्गदर्शक मान्यता कायम ठेवण्यात यावी. कॅम्पसवरील प्राध्यापकांप्रमाणेच महाविद्यालयीन प्राध्यापकांनाही संशोधक विद्यार्थी देण्यात यावेत, जेणेकरून हा भेदभाव संपेल, असा दावा निवेदनात केला आहे.

संशोधन अनुदान

विद्यापीठ निधीतून कॅम्पसवरील प्राध्यापकांना ज्या धर्तीवर संशोधन अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर महाविद्यालयीन प्राध्यापकांनाही किमान १,००,०००/- रुपये संशोधन अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

समित्यांमध्ये डावलले

विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नियुक्त्या करताना महाविद्यालयीन प्राध्यापकांना जाणीवपूर्वक डावलले जात असून, हा भेद मिटवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिसभेचे (सिनेट) ठराव रद्द करण्यावर आक्षेप

अधिसभेमध्ये (सिनेट) सर्वसंमतीने पारित झालेले प्राध्यापक हिताचे ठराव कोणत्या अधिकाराखाली रद्द करण्यात आले, याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करत जाणीवपूर्वक प्राध्यापकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न थांबवण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. तसेच, विद्यापीठ कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या परिनियमांच्या (Statutes) अंमलबजावणीची सद्यस्थिती विद्यापीठाने जाहीर करावी, असेही म्हटले आहे.

परीक्षा व सुट्ट्यांचे सुयोग्य नियोजन करा

शैक्षणिक सत्रांचे विस्कळीत झालेले वेळापत्रक रुळावर आणण्यासाठी सर्व शैक्षणिक सत्रे व परीक्षा एप्रिल महिन्यातच पूर्ण होतील, असे सुयोग्य नियोजन करावे. मात्र, हे नियोजन करताना प्राध्यापकांच्या हक्काच्या सुट्ट्यांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. याचबरोबर, उत्तरपत्रिका मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात तातडीने वाढ करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा आंदोलनाचा भडका उडणार!

“विद्यापीठ प्रशासनाने या सर्व मागण्यांवर साकल्याने व सकारात्मक विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा विद्यार्थी, शिक्षण आणि प्राध्यापक हितासाठी बामुक्टोला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल,” असा थेट इशारा संघटनेने दिला आहे.

या निवेदनावर बामुक्टोचे अध्यक्ष डॉ. बप्पासाहेब म्हस्के, सचिव डॉ. मारोती तेगमपुरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. शर्मा शेष, अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड आणि बीड जिल्हा अध्यक्ष डॉ. रामहरी मायकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित मंडळ

प्राध्यापकभरतीचा शासन निर्णय रद्द करा:’बामुक्टो’ प्राध्यापक संघटनेची CM देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, अन्यथा लढा उभारण्याचा इशारा

विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करा:अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ‘बामुक्टो’ प्राध्यापक संघटनेची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!