Homeमहाराष्ट्रहिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार: आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा,...

हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार: आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, फडणवीसांना दिला विचार करण्याचा सल्ला – Maharashtra News

महाराष्ट्र (मुंबई) : राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

आम्ही सक्तीचा जीआर काढला होता का? आम्ही प्रत्येक शाळेत मराठी भाषेची सक्ती केली होती. हिंदी भाषा लादण्याचे किंवा तिसरी भाषा लादण्याचे काम भाजपवाल्यांनी केले आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा

गेल्या तीन वर्षांत दोन मुख्यमंत्री वेगळे झालेत. ते सरकारमध्ये स्वत: बसलेत. पण आरोप आमच्यावर करत आहेत. नशीब ते नेहरूंवर पोहोचले नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. भाजपमध्येही अंतर्गत वाद आहेत, ते आपल्याला दिसत आहेत. दुसरे कोणी असे मंत्री आहेत का, ज्यांना फडणवीसांची जागा पाहिजे? हे ही असू शकते. सक्तीच्या जीआरची तारीख काय आहे? तो परवा काढला आहे. हे लोक कोणत्या धुंदीत आहेत? झोपेत आहेत का? हिंदीच्या सक्तीचा जीआर हा भाजपच्या सरकाने काढलेला आहे. भ्रष्टनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी काढलेला आहे. शिंदेंनाच फडणवाीसांना अडचणीत आणायचे नाही ना? हा देखील विचार करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारमध्ये कोण विरोधात काम करतंय हे ओळखावे. आपण सगळे भारतीय आहोच. पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा खरोखरच लादणार आहात का? याचा थोडा स्वार्थाचे राजकारण बाजुला ठेवून विचार करावा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

हिंदी सक्तीचा जीआर जोपर्यंत मागे घेतला जात नाही, तोपर्यंत उद्याचे आणि ५ जुलैचे आंदोलन चालूच राहिल. आमचा विरोध भाषेला किंवा भाषिकाला नाही. तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी लादत आहात, महाराष्ट्रात सक्ती करत आहात, त्याला आमचा विरोध आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये जी गडबड चालू आहे, त्याविरोधात आम्ही विरोधीपक्ष म्हणून उतरलो आहोत. आमच्यावर कोणतीही भाषा आम्ही लादू देणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.

… युवासेना शांत बसणार नाही

महाराष्ट्रात जवळपास २५ लाख विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. १३ मे रोजी दहावीचा निकाल लागला होता. १३ मे पासून आतापर्यंत प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली, त्यामध्ये पुढे कसे जायचे? याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही. ऑनलाइन फॉर्ममध्ये गडबडी आहे, ओटीपी येण्यामध्ये अडचणी येत आहेत. वेबसाइट देखील कोलमडली. ११ वी प्रवेशाची यादी लागली नाही, तर युवासेना शांत बसणार नाही, असा इशाराही आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.

हे ही वाचा…

हिंदीत नाही, मी मराठीतच बोलणार!:मंत्री अशोक उईके यांचे पुण्यात विधान; देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा

राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून मोठे आकांडतांडव माजले आहे. या प्रकरणी सरकार व विरोधकांत कमालीची राजकीय चिखलफेक होत असताना आता भाजपच्याच एका मंत्र्याने महायुती सरकारला घरचा आहेर दिल्याची बाब समोर आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपल्यावर मराठीचे संस्कार झाल्यामुळे आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार असे ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!