धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी, तेथे उपकारासाठी आले घर ज्या, लटिके वचन नाही देही उदासीन, मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी हा संत तुकारामांच्या अभंगावर सद्गुरू प्रभाकरदादा महाराज बोधले म्हणाले, खरे संत हे घरसंसारात असूनही परमार्थाशी जोडलेले असतात. ज
?
श्रीक्षेत्र धामणगाव येथे श्री संत माणकोजी महाराज बोधले यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शनिवारी दुपारी आयोजित पुष्पवृष्टीच्या कीर्तनसेवा कार्यक्रमाचा भव्य सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यात संत तुकाराम महाराजांचे वंशज पुरुषोत्तम महाराज मोरे व माणिक महाराज मोरे यांच्यासह सतीश महाराज कंधारकर (पंढरपूर), सोपानकाका महाराज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, शिवाजीराव काळुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. धामणगावमध्ये श्री माणकोजी बोधले महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला पुष्पवृष्टी करण्यासाठी जमलेल्या महिला भाविक. बोधले महाराजांचे या वेळी निरूपण झाले. या वेळी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रासह कर्नाटकातून सोहळ्यास आले भाविक संजीवन समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अध्यात्माने भारलेला ठरला. कार्यक्रमाची सांगता दुपारी १२ ते ३ दरम्यान महाप्रसादाने झाली.
८० जणांचे रक्तदान जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून या सोहळ्यादिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ८० भाविकांनी रक्तदान केले.भगवंत ब्लड बँक व शहा रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.





























