Homeदेश-विदेशजम्मू काश्मीर पहलगम हल्ल्यात काय घडले ते भारत पाकिस्तान युद्ध तणाव यूएनएससी...

जम्मू काश्मीर पहलगम हल्ल्यात काय घडले ते भारत पाकिस्तान युद्ध तणाव यूएनएससी बंद सल्लामसलत


भारत पाकिस्तान तणाव: (Jammu Kashmir) जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावात आणखी भर पडली. सातत्यानं होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन असो किंवा सीमाभागात दहशतवादी तळांमध्ये होणारा अन्नाचा किंवा पैशांचा पुरवठा असो. पाकिस्ताननं भारताला डिवचण्याचे सर्वतोपरि प्रयत्न केले. मात्र त्यांच्या याच कटकारस्थानांमुळं आता हेच वैर शेजारी राष्ट्राला भोवताना दिसत आहे.

भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Tensions) या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती वाढत असतानाच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेनं एका बंद खोलीत उच्चस्तरिय बैठक घेतली. जिथं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या संवेदनशील परिस्थितीत संयमानं कोणतंही पाऊल उचलावं आणि चर्चेतून यावर तोडगा काढावा असं आवाहन सदस्य राष्ट्रांनी केलं.

5 मे 2025 रोजी पार पडलेल्या या बैठकीसंदर्भातील कोणतंही अधिकृत विधान UN च्या वतीनं जारी करण्यात आलेलं नाही. मात्र संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे मुद्दे जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावावर तोडगा काढत या परिस्थितीवर चर्चात्मक मार्गानं कोणती वाट काढता येईल आणि माहितीच्या देवाणघेवाणीनं कशा प्रकारे ही चर्चा अधिक सक्षम करता येईल यावर भर देण्यात आल्याचं ते म्हणाले. तर, ग्रीसच्या राजदूतांनी या बैठकीतून सकारात्मक परिणाम दिसून आल्याची माहिती दिली. आम्हाला हा तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती रशियाच्या राजदूतांनी दिली.

भारतीय अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली?

सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वी भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सह्यद अकबरुद्दीन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना या बैठकीतून किंवा चर्चेतून कोणताही तोडगा निघेल अशी आशा वाटत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तर, या बैठकीनंतर ते म्हणाले, ‘यापूर्वीप्रमाणेच आजही पाकिस्तानची अरेरावी इथं अपयशी ठरली. याआधी अपेक्षित असल्याप्रमाणेच परिषदेकडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया देण्यात आली नाही. भारतीय कूटनितीनं सुरक्षा परिषदेच्या हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या पाकिस्तानच्या सर्वच प्रयत्नांना हाणून पाडलं’.

UN महासचिवांनीही केली पहलगाम हल्ल्याची निंदा

बंद खोलीत झालेल्या या पैठकीपूर्वीच संयुक्त राष्ट्र संघटनेते महासचिव एंटोनियो गुटरेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या या तणावाला आतापर्यंतच्या गंभीर स्तराचा तणाव म्हणून संबोधत चिंता व्यक्त केली आणि या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली. नागरिकांना निशाण्यावर घेणं स्वीकारार्ह नसल्याचं त्यांनी परखड स्वरांत म्हटलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!