Homeमनोरंजनव्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मद्य आणि अशा कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्यास सांगत हर्षवर्धन...

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मद्य आणि अशा कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्यास सांगत हर्षवर्धन राणे पोस्ट


बाबिल खान व्हायरल व्हिडिओ: दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बाबिल खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये तो भावूक होऊन रडताना दिसत होता. इतकंच नाही तर बॉलिवूड खराब झालं आहे असं सांगताना शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी आणि इतर अनेक अभिनेत्यांची नावं घेतली. वाद निर्माण झाल्यानंतर त्याने आपलं इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं होतं. पण नंतर त्याने ते पुन्हा सुरु केलं. बाबिलच्या कुटुंबाकडून याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आलं असून, चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा केला आहे. यादरम्यान अभिनेता हर्षवर्धन राण्ने बाबिल खान दारु आणि इतर गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

हर्षवर्धनची बाबिलसाठी पोस्ट

बाबिलसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये हर्षवर्धन म्हणाला आहे की, “प्रिय बाबिल खान, देवाच्या कृपेने तुला अभिनयाचा वारसा मिळाला आहे. तू हा वारसा पुढे नेण्याची गरज आहे! कृपया या कलाकृतीला तुझे सर्वोत्तम दे. कार्यक्रम आणि पार्ट्यांपासून दूर राहा. जेणेकरून गरज नसणाऱ्या लोकांशी संवाद टाळता येईल.”

‘लोक तुम्हाला वाईट वागणूक देणार नाहीत जर…’

पुढे त्याने म्हटलं आहे की, “मी चित्रपट कुटुंबातील नाही. पण जर तुम्ही लोकांना परवानगी दिली नाही तर लोक तुमच्याशी वाईट वागणार नाहीत हे मी शिकलो आहे. तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहण्याची’ गरज आहे. तसंच कृपया दारू आणि अशा कोणत्याही गोष्टींपासून दूर राहा. कारण उंच उभे राहण्यासाठी तुम्हाला ताकदीची आवश्यकता असते. कृपया काळजी घे”.

कुटुंबावर स्पष्टीकरण देण्याची वेळ

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, बाबिलने तात्काळ तो डिलीट केला. इतकंच नाही तर आपलं इंस्टाग्राम अकाउंट देखील डिलीट केलं. यादरम्यान त्याच्या कुटुंबाने एक अधिकृत स्टेटमेंट जारी केलं. बाबिलच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा यात करण्यात आला आहे. प्रत्येकाचे खराब दिवस असतात आणि बाबिलाही ते असण्याची परवानगी आहे असंही सांगण्यात आलं आहे.

“क्लिपमध्ये, बाबिल त्याच्या काही सहकारी अभिनेत्यांचं प्रामाणिकपणे कौतुक करत होता जे भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकसित योगदान देत आहेत असं त्याला वाटतं. अनन्या पांडे, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव, अर्जुन कपूर आणि अरिजित सिंग यांचं तो कौतुक करत होता. त्यांचा प्रामाणिकपणा, आवड आणि विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न य़ाबाबत तो उल्लेख करत होता,” असं कुटुंबाकडून सांगण्यात आलं आहे.

बाबिल हा इरफान आणि सुतापा सिकदर यांचा मुलगा आहे. त्याने काला (2022) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तो शेवटचा लॉगआउटमध्ये दिसला होता, जो ZEE5 वर प्रदर्शित झाला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!