Homeदेश-विदेशपाकिस्तान सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनिर यांनी वाढत्या सीमा तणावात भारताला लष्करी...

पाकिस्तान सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनिर यांनी वाढत्या सीमा तणावात भारताला लष्करी गैरवर्तनविरूद्ध भारताला इशारा दिला.


असीम मुनीरला भारताला चेतावणी: पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी गुरुवारी पुन्हा भारताला इशारा देत गरळ ओकली आहे. भारताने केलेल्या कोणत्याही ‘लष्करी साहसाला’ ‘त्वरित, दृढ आणि कडक प्रत्युत्तर’ देण्यात येईल. सशस्त्र दलांनी आयोजित केलेल्या फील्ड ट्रेनिंग सरावासाठी मुनीर ‘फायरिंग रेंज’मध्ये उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि नवी दिल्लीकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तराची अपेक्षा असून इस्लामाबादसहीत पाकिस्तानी सैन्यात भीतीचं वातावरण आहे. असं असतानाही पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे हे विधान समोर आले आहे. यापूर्वी मुनीर यांच्या पाकिस्तानमधील उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. ते पाकिस्तान सोडून पळून गेल्याच्या बातम्या चर्चेत होत्या.

काय म्हणाले मुनीर

पाकिस्तानची सरकारी वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी) यासंदर्भातील वृत्त देताना, ‘भारताच्या कोणत्याही चुकीच्या लष्करी कृतीला जलद, ठाम आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल यात कोणतीही शंका नसावी,’ असे पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी सैनिकांसमोर दिलेल्या भाषणात म्हटल्याचं नमूद केलं आहे. ‘पाकिस्तान प्रादेशिक शांततेसाठी वचनबद्ध असला तरी, आम्ही राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यास पूर्णपणे तयार आहोत,’ असे मुनीर यांनी टिल्ला फील्ड फायरिंग रेंज (TFFR) येथे सैनिकांना संबोधित करताना म्हटले आहे. लष्कर मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने जारी केलेल्या प्रेस रिलीजचा हवाला देत एपीपीने वृत्त दिले आहे की, जनरल मुनीर यांनी ‘हॅमर स्ट्राइक’ सराव पाहण्यासाठी टीएफएफआरला भेट दिली. युद्धाच्या परिस्थितीत लढाईसंदर्भातील तयारी, युद्धभूमीतील समन्वय आणि अत्याधुनिक शस्त्र प्रणालींचे ऑपरेशन प्रमाणित करणे हे या सरावाचे उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जात आहे.

अमेरिकेचं भारत-पाकिस्तानला आवाहन

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) च्या निवेदनानुसार, ‘पाकिस्तानला प्रादेशिक शांतता हवी आहे, परंतु राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आमची तयारी आणि वचनबद्धता अटळ आहे,’ असं मुनीर यांनी भाषणात म्हटलं आहे. भारताच्या कारवाईच्या शक्यतेमुळे पुढील 36 तास महत्त्वाचे असतील, असे पाकिस्तानने बुधवारी म्हटले होते. तथापि, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांना संयम बाळगण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी चर्चेतून तणाव मिटवावा असं आवाहन पाकिस्तानकडून करण्यात आलं आहे. दुसरीकडे भारतीय तपास यंत्रणांना पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे सबळ पुरावे मिळाले असून सध्या पहलगाममध्ये 26 पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!