Homeमहाराष्ट्रचेहऱ्यावर निराशा,हताश नजरा; भारत सोडवेना! दहशतवाद्यांच्या पापाची शिक्षा भोगतायत पाकिस्तानी

चेहऱ्यावर निराशा,हताश नजरा; भारत सोडवेना! दहशतवाद्यांच्या पापाची शिक्षा भोगतायत पाकिस्तानी


भारतात पाकिस्तानी नागरिक: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र यामुळं ज्यांचे नातेवाईक भारतात आहेत अशा पाकिस्तानी नागरिकांची मोठी अडचण झालीय. त्यांची काय अवस्था झालीय. चेहऱ्यावर निराशा.. हताश नजरा. भारत सोडावा लागत असल्याचा डोळ्यात दिसणारा चलबिचलपणा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या कठोर भूमिकेंनतरची ही दृश्य. पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळं लग्नकार्य, वैद्यकीय उपचार किंवा नातलगांना भेटायला आलेल्या अनेकांना अचानक भारत सोडून पाकिस्तनात जावं लागतंय.

विवाहीत जोडप्यांना वेगळं न करण्याची विनंती

पंजाबच्या अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात परतणारी समरीन मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 45 दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली. इथं तिचं रिझवानसोबत लग्न झालं. ती गरोदरही राहिली. तिला अजून दीर्घकालीन व्हिसा मिळालेला नाही. त्यात आता तिला अचानक देश सोडून पाकिस्तानला परत जायला सांगितलं गेलंय. सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना टुरिस्ट व्हिसा रद्द करावा मात्र भारताशी नातं जोडलेल्या कुटुंबांना तोडू नये अशी विनंती तिनं केंद्र सरकरला केलीय. समरीनचे पती रिझवान यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. मात्र या सगळ्यात किमान विवाहीत जोडप्यांना वेगळं करु नये अशी विनंती त्यांनी सरकारला केलीय.

https://www.youtube.com/watch?v=1v5ie3opcc0

पुन्हा जावं लागणार सासरी

दुसरीकडे राजस्थानच्या जोधपूर शहरातील महिलेची वेगळीच कथा आहे. तिचं लग्न पाकिस्तानात झालंय. ती माहेरी आली होती. मात्र आता तिला वेळेआधीच पाकिस्तानला परत जावं लागतंय. गुन्हेगारांना शिक्षा जरुर व्हावी मात्र सामान्य लोकांना नको अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

मुलाकडे पाकिस्तानी पासपोर्ट

तिसरी गोष्ट आहे एका आईची. या भारतीय महिलेचं 10 वर्षापूर्वी पाकिस्तानात लग्न झालं. तिच्या दोन्ही मुलांचा जन्म भारतात झाला, मात्र मुलांकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. आपण आपल्या मुलांसोबत पाकिस्तानात जाऊ शकत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात परतणारे पाकिस्तानी नागरिक कृष्ण कुमार यांनीही सरकारला विनंती केलीय. आपण टुरिस्ट व्हिसावर 45 दिवसांसाठी भारतात आलो.. मात्र दहशतवादी हल्ल्यानं दोन देश वेगळे केले. दोन्ही देशांनी एकत्र राहावं कारण अर्धी कुटुंबे पाकिस्तानात आहेत अर्धी भारतात. त्यामुळे त्यांची ताटातूनट होऊ नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं दोन धर्म, दोन देशात पुन्हा कटुता आलीय. मात्र याची झळ दोन्ही देशात कुटुंब असलेल्या अनेक कुटुंबांनाही बसतेय. भारतात येऊन दहशत माजवणाऱ्या दहशतवाद्यांनी हीदेखिल दृश्य बघावी. दहशतवाद्यांनी केलेल्या पापाची फळं सध्या अनेक पाकिस्तानींना भोगावी लागताहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…’:ओक्साबोक्शी रडत ‘सैराट’ फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट...

0
'सैराट' चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र 'सल्या' (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे....

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जीवनात सुख-शांती, समाधान आपल्या ज्ञान, समजूतदारपणा, सत्य आणि सकारात्मक विचारांवर...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जीवनातील आनंद, शांती आणि समाधान हे आपले ज्ञान, शहाणपण, सत्यता आणि सकारात्मक...

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...

राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला:ज्या हरियाणवी वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले,...

0
NEET वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी UGC-NET परीक्षेतील नवीन पेपरफुटीचा दावा केला आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...
error: Content is protected !!