Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे आणखी एक स्थानक, हाय स्पीड रेल मुंबईतून कधी धावणार?...

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे आणखी एक स्थानक, हाय स्पीड रेल मुंबईतून कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. बुलेट ट्रेन मुंबईत व महाराष्ट्रात कधी धावणार याची चर्चा सतत होत असते. सध्या गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी स्थानकांची उभारणी केली जात आहे तर काही ठिकाणी पुलांची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळं आता बुलेट ट्रेन कधी धावणार याची प्रतिक्षा नागरिकांना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन वाढवण बंदराशीही जोडण्यात येणार आहे. तर अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं होतं की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे एक स्थानक वाढवणजवळही करण्यात येणार आहे. तर, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने 21 एप्रिल रोजी ट्विट केल्यानुसार मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये बुलेट ट्रेन स्थानकाचे काम जवळपास 75 टक्के पूर्ण झाले आहे. NHSRCLच्या प्रवक्तानुसार, स्थानकासाठी आवश्यक असलेल्या 18,772,63 क्यूबिक मीटर जमिनीत जवळपास 14 लाख क्यूबिक मीटर जमीनीचे खोदकाम करण्यात येत आहे.

बुलेट ट्रेन कधी सुरू होणार?

बुलेट ट्रेन सुरू होण्यासाठी आणखी तीन वर्ष लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2028 पर्यंत बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

तीन तासांत मुंबई ते अहमदाबाद

508 किमी लांबीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान वेळेची बचत होऊन 6 ते 8 तासांनी कमी होऊन फक्त 3 तासांत पूर्ण होणार आहे. 2026मध्ये सूरत आणि दक्षिण गुजरातच्या बिलिमोरा दरम्यान 50 किमी मार्गावर बुलेट ट्रेनची पहिली चाचणी होणार आहे. या कॉरिडोरवर एकूण 12 स्थानके असणार आहेत. मुंबईत भूमिगत स्थानक असणार आहे. तर ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमतीमध्ये एलिवेटेड स्थानक बनवण्यात येणार आहेत.

जवळपास 1.1 लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2017 मध्ये अहमदाबादच्या साबरमतीमध्ये भूमीपूजन केले. जपान सरकार या प्रकल्पासाठी 0.1 टक्के व्याजदराने 88,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी 50 वर्षांचा वेळ भारताकडे असणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून प्रकरणाचा आज अंतिम फैसला:राज्यातील सर्वात वेगवान खटला ठरण्याची शक्यता

0
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल आज, 25 जून रोजी जाहीर होणार आहे. हा खटला...

शिवसेना ठाकरे गटाला संसदेतील कार्यालय रिकामे करावे लागणार:फूट पडल्यानंतर खासदारांची संख्या घटली; किमान 5...

0
शिवसेना (UBT) ला संसद भवनातील त्यांचे सध्याचे कार्यालय रिकामे करावे लागू शकते. संसद भवनाच्या नियमांनुसार, फक्त 5 किंवा त्याहून अधिक खासदार असलेल्या पक्षाला...

सिगारेट न दिल्याने वृद्धाचा खून:अमरावतीत एकाला अटक, दोन आरोपी फरार

0
सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, २४ जून रोजी सकाळी राजापेठ पोलीस...

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार | भाजपनवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी...
spot_img

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...

संजय लीला भन्साळींविरुद्ध FIRची मागणी:लव्ह अँड वॉरच्या सेटवर विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू, असोसिएशनने...

0
संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर झालेल्या अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई फिल्मसिटीजवळच्या रॉयल पंप स्टुडिओमध्ये सुरू...

मेटा, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये AIचा वापर मर्यादित:वेगाने येणारे नवीन मॉडेल महाग झाल्याने खर्च वाढला;...

0
या वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये एआय टूल्सवर खर्च होणाऱ्या 'टोकन'च्या संख्येवरून...
error: Content is protected !!