HomeमनोरंजनAkshay Kumar : 'टॉयलेट: एक प्रेम कथा नावाचा चित्रपट...'; जया बच्चन यांचं...

Akshay Kumar : ‘टॉयलेट: एक प्रेम कथा नावाचा चित्रपट…’; जया बच्चन यांचं ‘ते’ वक्तव्य अन् अक्षय कुमार त्यांचं नाव घेत म्हणाला…


अक्षय कुमार: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘केसरी: चॅप्टर 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान, एका पत्रकारानं अक्षयसमोर जया बच्चनविषयी वक्तव्य केलं. त्या पत्रकारानं जया बच्चन यांना त्याचा चित्रपट ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हे नाव आवडलं नाही आणि त्यामुळे त्या हा चित्रपट पाहणार नाहीत याविषयी सांगितलं. तर अक्षयनं यावर जे उत्तर दिलं त्यावर अक्षयनं नम्रतेनं उत्तर दिलं आणि सगळीकडे त्याची चर्चा रंगली आहे.

अक्षयनं या मुलाखतीत उत्तर देत सांगितलं की जर त्यांनी (जया) यांनी म्हटलं असेल तर ते योग्यच असेल. जर असा चित्रपट बनवून मी चूक केली असेल तर त्या जे बोलतायत ते योग्य आहे. ‘इंडिया टीवी कॉन्क्लेव’ मध्ये नुकत्याच त्याच्या उपस्थिती दरम्यान, जया बच्चन यांनी या चित्रपटाच्या नावावरून प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या चित्रपटाला फ्लॉप असल्याचं देखील म्हटलं होतं.

जया बच्चन तेव्हा म्हणाल्या होत्या की ‘फक्त चित्रपटाचं नाव बघा. मी तर अशा नावाचा चित्रपट कधीच नाही पाहणार. हे काही नाव आहे? असं कधी नाव असतं का?’ त्यानंतर जया बच्चन यांनी प्रेक्षकांकडे पाहिलं आणि विचारलं की ‘ते अशा टायटलचा चित्रपट पाहण्यासाठी तयाार आहेत?’ जेव्हा काही लोकांचेच हात वर पाहिले त्यानंतर त्या मस्करी करत म्हणाल्या, ‘इतक्या लोकांमधून फक्त चार लोकं आहेत जे हा चित्रपट पाहायला तयार आहेत. ही तर फार वाईट गोष्ट आहे. हा तर फ्लॉप आहे.’

जया बच्चनच्या प्रतिक्रियेवर लोकांनी नाराजी व्यक्त करत सांगितलं की जया मॅमला 1 महिना अशा गावात सोडा जिथे अशी परिस्थिती आहे त्यानंतर विचारा. दुसरा नेटकरी म्हणाला, मग तर टॉयलेटमध्ये देखील या मॅडम जात नसतील. तर अनेक नेटकऱ्यांनी अक्षयनं दिलेल्या उत्तराची स्तुती केली आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, अक्षयनं काय हुशार व्यक्ती सारखं उत्तर दिलं आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, अरे ही काहीही बोलते, तिला स्वत: ला माहित नसेल ती काय बोलते.

हेही वाचा :नीट उभं राहता पण येत नाही!’ फुल नशेत संजय दत्तच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘केसरी चॅप्टर 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट रघु पालत आणि पुष्पा पालत यांचं पुस्तक ‘द केस दॅट शुक द एम्पायर’ वर आधारीत आहे. या चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारीत आहे. त्यावेळी काय झालं याच्या कधी न ऐकलेल्या गोष्टी आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वकील सी शंकरन नायर यांच्या नेत्तृत्वात झालेल्या लढाई संबंधीत आहे. हा चित्रपट 18 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!