Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकश्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

ब्रेकिंग न्यूज
श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius gemini cancer singh rashi meen libra leo aries taurus kanya scorpio and other signsउजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य सचिवांना समन्स !श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?गणपतीला लाल फुल का वाहतात ?गणेशोत्सव निमित्त विशेष लेखगणेशोत्सव निमित्त विशेष लेखशुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतोबुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यतासोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध राहावे लागेल

गोवा – पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा पारंपारिक श्राद्ध विधी तो करणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि त्याच्या पूर्वजांमध्ये मोजता येण्याजोगे ऊर्जेतील बदल घडवून आणू शकतो का? महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा यांनी केलेल्या एका अभ्यासातून अत्यंत असाधारण निष्कर्ष समोर आले आहेत.

या अभ्यासात, चार श्राद्धकर्त्यानी (त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह) त्यांच्या पितरांसाठी श्राद्ध विधी केला आणि दोन पुरोहितांनी विधी संपन्न केला. संशोधक पथकाने ‘ऑरा अँड एनर्जी स्कॅनर’ (Aura and Energy Scanner) चा वापर करून विधीपूर्वी आणि विधीनंतर श्राद्धकर्त्या व्यक्ती, पुरोहित आणि विधीतील घटकांच्या सूक्ष्म ऊर्जेच्या प्रभावळीच्या (Aura) नोंदी घेतल्या.

विशेष म्हणजे, चारही श्राद्धकर्त्यामधील नकारात्मक ऊर्जेत सुमारे ५०% घट झाली आणि सकारात्मक ऊर्जेत सुमारे दुप्पट वाढ झाली. चौथ्या श्राद्धकर्त्याच्या पत्नीच्या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत तब्बल ६०% घट झाली, तर तिची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १००% हून अधिक वाढली. विधीमध्ये सहभागी झालेल्या पुरोहितांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत विधीनंतर सरासरी ५५% हून अधिक वाढ झाली. भगवान दत्तात्रेयांच्या (रक्षण करणारी आणि पितरांना गती देणारी देवता) प्रतिमेच्या सकारात्मक ऊर्जेत विधीनंतर ४७% ची उल्लेखनीय वाढ दिसून आली.

संशोधकांनी विधीच्या घटकांमध्येही, उदा. पिंड, दर्भ आणि नैवेद्य यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल नोंदवले. पितरांना अर्पण केलेले अन्न (पिंड – तीळ मिसळलेला भात) आणि दर्भ यांच्या नकारात्मक ऊर्जेत विधीनंतर अनुक्रमे २५ मीटर आणि १९ मीटरहून अधिक वाढ दिसून आली. देवांना दाखवलेल्या नैवेद्याच्या सकारात्मक ऊर्जेत श्राद्धानंतर १४४% एवढी थक्क करणारी वाढ झाली. एका पूर्वजांच्या छायाचित्रातील नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ५४% घट झाल्याचे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे आढळले.

अशा उल्लेखनीय नोंदी या विधीच्या प्राचीन तरीही वैज्ञानिक आधाराची साक्ष देतात. श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीलाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही आध्यात्मिक लाभ मिळतो. हा विधी जर भावपूर्ण (भाव ठेवून) केला तर मिळणारी सकारात्मक ऊर्जा अधिक असते. भगवान दत्तात्रेय ही पितरांना गती देणारी देवता आहेत. श्राद्धाच्या ठिकाणी त्यांचे चित्र ठेवून त्यांची भावपूर्वक पूजा केल्याने त्यांचे तत्त्व कार्यरत होते;ज्याचा फायदा कुटुंबातील सर्व सदस्यांना होतो आणि पूर्वजांना त्यांच्या परलोकातील प्रवासात गती मिळते. मंत्रोच्चारासह पितरांना अर्पण केलेला पिंड त्यांना आकर्षित करतो व तृप्त करतो, ज्यामुळे त्यांना गती मिळण्यास मदत होते आणि त्यांच्यामुळे वंशजांना होणारा त्रास कमी होतो.

संशोधकांचा असा निष्कर्ष आहे की, श्राद्ध विधीमुळे विधी करणारे वंशज, त्यांचे कुटुंब, पुरोहित आणि पूर्वज या सर्वांना आध्यात्मिक लाभ मिळतो, जे हिंदू परंपरेतील या विधीचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करते. श्राद्धासोबतच, आध्यात्मिक लाभ वाढवण्यासाठी पितृ पंधरवड्यादरम्यान दररोज एक ते दोन तास “ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ” हा नामजप करावा.

— सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!