Homeदेश-विदेश‘एसआयआर’मुळे राज्यातील किमान 1 कोटी मतदारांची नावे कमी होणार:कोणत्या त्रुटींमुळे मतदार यादीतून...

‘एसआयआर’मुळे राज्यातील किमान 1 कोटी मतदारांची नावे कमी होणार:कोणत्या त्रुटींमुळे मतदार यादीतून नाव कापले जाईल, पाहा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मुलाखत

राज्यात विशेष मतदार यादी पडताळणी मोहीम (एसआयआर) सुरू आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. त्यांच्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेत मतदारांसह सरकारी यंत्रणेचाही निरुत्साह दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरात ६४ टक्के मतदारांची पडताळणी रखडली आहे. अशीच परिस्थिती विविध जिल्ह्यांत आहे. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले की, एसआयआरमुळे राज्यातील किमान १ कोटी लोकांची नावे कमी होतील.दरम्यान, या मोहिमेला ८ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. आता ८ ऑगस्टपर्यंत बीएलओ घरोघरी जाऊन मतदार याद्यांची पडताळणी करतील. १९ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल. नागरिकत्वाशी नाव कापण्याचा संबंध नाही
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पुनरुच्चार केला की, एसआयआरमध्ये केवळ मतदार यादीतून एखाद्याचे नाव काढल्याने नागरिकत्व रद्द होत नाही. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सध्या या संदर्भातील पश्चिम बंगालमधील लोकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करत आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. ‘या’ त्रुटींमुळेच मतदार यादीमधून नाव कापले जाणार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी प्रश्नोत्तरातून महत्त्वाची माहिती दिली. ती अशी : प्र.: नावे कमी होण्याची भीती मतदारांमध्ये का आहे?
उ.: मतदार मूळ पत्त्यावर राहत नसेल, दुसरीकडे नाव नोंदवले असेल, मतदाराचा मृत्यू झाला असेल आणि एकच नाव दोन ठिकाणी असेल तरच नाव कापले जाणार. प्र: नोंदणी पडताळणी (मॅपिंग) न झाल्यास काय होईल?
उ.: ज्यांचे मॅपिंग होणार नाही, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने ‘आधार’सह १२ पर्यायी कागदपत्रे अधिसूचित केली आहेत. २००२ च्या मतदार यादीत नाव असणाऱ्यांना (ज्यांचा जन्म १९८७ पूर्वी झाला आहे) कोणत्याही पुराव्याची गरज नाही. इतरांनी इन्युमरेशन फॉर्मवर अचूक माहिती आणि स्वाक्षरी दिली, तरी ड्राफ्ट यादीत नाव समाविष्ट होईल. कागदपत्रे देण्यासाठी पुढे दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. प्र.: मुस्लिमांची नावे मुद्दाम वगळली जात आहेत का?
उ.: कुणालाही टार्गेट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही केवळ एक कायदेशीर पडताळणी प्रक्रिया आहे. कुणीही मनात कोणतीही शंका किंवा भीती बाळगू नये.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!