Homeमहाराष्ट्रराममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या विश्वस्तांवर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे. कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पोलीस ठाण्यात यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत देशभरातील लाखो भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. यावेळी भक्तांनी मंदिरातील तब्बल ३५ दानपेट्यांमध्ये श्रद्धेने कोट्यवधी रुपयांचे दान जमा केले. या देणग्यांचे योग्य नियोजन आणि विनिमय करण्याची जबाबदारी ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या विश्वस्तांची होती. मात्र, विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून या देणग्यांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा गैरव्यवहार म्हणजे केवळ एखाद्या संस्थेतील प्रशासकीय त्रुटी नसून, तो देणगी देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताची झालेली फसवणूक आहे, असे ॲड. सिंग यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. ‘हा तर राष्ट्रविरोधी गुन्हा’; कठोर कारवाईची मागणी काँग्रेसने या प्रकरणाचे गांभीर्य विषद करताना म्हटले आहे की, देणग्यांचा अपहार हा केवळ एक आर्थिक गुन्हा नाही, तर तो समाजाविरुद्ध आणि राष्ट्राविरुद्ध केलेला अत्यंत गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची तातडीने आणि निष्पक्षपातीपणे चौकशी सुरू करावी. दोषी विश्वस्तांना अटक करून त्यांना पोलीस कोठडी द्यावी आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह दोषी विश्वस्तांना अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने कल्याणमध्ये लक्षवेधी आंदोलन केले. ॲड. नवीन सिंग यांच्या पुढाकाराने महात्मा फुले पोलीस ठाण्याबाहेर ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ करण्यात आला. विशेष म्हणजे, हे निवेदन देताना राम, लक्ष्मण आणि सीतेच्या वेशातील प्रतीकात्मक कलाकारांना सोबत ठेवण्यात आले होते. या निवेदनावर कल्याण शहर जिल्हा काँग्रेसच्या ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदन देताना साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने उपस्थित होते. आता पोलीस या निवेदनावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… शेरनी अगर शांत है, तो डकारणा नहीं भूलती:नवनीत राणांचा विरोधकांना थेट इशारा, स्वाभीमानामुळे राज्यसभेला ठोकर मारल्याचे मत व्यक्त लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘माजी खासदार’ झाल्याचे शल्य मनात असले तरी आपण शांत बसलेलो नाही, असा सज्जड इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी विरोधकांना दिला आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला. यावेळी त्यांनी राज्यसभा खासदारकीवरूनही मोठा दावा केला आहे. सविस्तर वाचा… वारीमध्ये वारकऱ्यांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा:जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी, पण वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ; विरोधकांची सरकारवर टीका पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. सविस्तर वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...

युरोपची सिलिकॉन व्हॅली बनले विल्नियस:शहराची लोकसंख्या 29 लाख, 6 युनिकॉर्न कार्यरत; स्टार्टअपच्या बाबतीत जगात...

0
सकाळचे साधारण दहा वाजले आहेत. लिथुआनियाची राजधानी विल्नियसच्या सायबर सिटीमध्ये काचेच्या उंच इमारतींमधून तरुण व्यावसायिक वेगाने चालत आहेत. एका बाजूला नॉर्ड सिक्युरिटीसारख्या जगभरात...
spot_img

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...

झिरोधाच्या संस्थापकाने सांगितले आशेचे सूत्र:आशा म्हणजे परिणाम काहीही असो, तुम्ही पुढचे पाऊल टाकणे कधीच...

0
माझ्यासाठी, आशेचा अर्थ फक्त 'सर्व काही ठीक होईल' असा विचार करणे नाही. आशा तेव्हाच सामर्थ्य बनते, जेव्हा तिच्यासोबत कोणतीही समस्या सोडवण्याचा स्पष्ट उद्देश...
error: Content is protected !!