महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला भिवंडी पोलिसांकडून मोठी गती मिळाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सखोल तपासासाठी पोलिसांनी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठे आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय असल्याचा दाट संशय असून, गुन्ह्यातील आणखी दोन मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात पकडण्यात आलेले धीरज बलराज सिंग (वय 28, रा. हरियाणा), राजीव साव (वय 45, रा. बिहार) आणि आकाशकुमार स्वराजकुमार (वय 30, रा. बिहार) या तीन आरोपींना रविवारी भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. तपासादरम्यान या आरोपींकडून टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. तसेच, या गुन्ह्यामागील आंतरराज्यीय साखळी उघडकीस आणण्यासाठी व फरार असलेल्या दोन संशयितांना पकडण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले. आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी हा पेपर नेमका कुठून आणि कसा लीक झाला, महाराष्ट्रात तो आणखी कुठे कुठे विकला गेला आहे का, यातील आर्थिक व्यवहार कशा प्रकारे व कोणासोबत झाले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे लागेबांधे आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकून घेतली व आरोपींना 8 दिवसांची म्हणजेच 6 जुलैपर्यंतची पोलिस कोठडी मंजूर केली. आरोपी धीरज सिंगवर वैद्यकीय उपचार दरम्यान, सुनावणीच्या वेळी आरोपी धीरज सिंग याच्यावर यापूर्वी बॅरिएट्रिक (आतड्याची) शस्त्रक्रिया झाली असल्याने, त्याला नियमित औषधोपचारांची आवश्यकता असल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर, आरोपीला आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार पोलिसांकडून दिले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोठडी सुनावली असून, आता या कालावधीत फरार आरोपींचा शोध, गुन्ह्यातील पैशांचा मार्ग आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यावर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
Source link
TET पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक:6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, भिवंडी पोलिसांच्या तपासाला वेग; आणखी दोन आरोपी फरार
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























