Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकपंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे मातरमला दिलेल्या सर्वोच्च सन्मानाला विरोध करण्यासाठी कांग्रेसने गाठली...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे मातरमला दिलेल्या सर्वोच्च सन्मानाला विरोध करण्यासाठी कांग्रेसने गाठली खालची पातळी !

दिल्ली सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात वंदे मातरम्” गीताच्या प्रदर्शन आणि सन्मानासाठी शासकीय निधी !

         सनातन संस्थेने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १३ ते  १५ डिसेंबर या कालावधीत दिल्ली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित केला होता. या निमित्ताने देशभरातील विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातून हजारो हिंदुत्वनिष्ठ येणार असल्याने त्यांच्या समोर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या संकल्पनेनुसार ‘वंदे मातरम’चा गौरव व्हावा, या दृष्टीने सनातन संस्थेने वंदे मातरम् गीताचे भव्य प्रदर्शन तीन दिवस भारत मंडपमच्या शेजारील हॉल क्र. १२ मध्ये आयोजित केले होते. तसेच मुख्य कार्यक्रमात वंदे मातरमचे समूह गान आयोजित केले होते. त्याचबरोबर या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शस्त्रे होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. मंत्र्यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले होते आणि त्यासाठी नियमित शासकीय पद्धतीने आम्ही शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सर्व प्रशासकीय मान्यता घेऊन शासनाने त्याला मान्यता दिली. या व्यतिरिक्त उर्वरित कार्यक्रम हा सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाचा होता आणि त्याचे नावच ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ असे होते, त्यामुळे त्याला हिंदू राष्ट्राचा महोत्सव म्हणून खोटा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे, असे उत्तर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिले आहे.

          सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. वर्तक पुढे म्हणाले की, या कार्यक्रमात कोणतेही भारतीय संविधान विरोधी भाषण झाले नाही. सर्व वक्त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची बाजू मांडली आणि त्यावर उपाययोजना सांगितल्या. प्रत्यक्षात कांग्रेसचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री घटनात्मक पदावर असताना “कांग्रेस मतलब मुस्लिम और मुस्लिम मतलब कांग्रेस” अशी घटनाविरोधी घोषणा करतात, काँग्रेसचे तत्कालीन प्रधानमंत्री “इस देश की साधनसंपत्ती पर पहिला अधिकार मुसलमानो का है”, असे वक्तव्य करतात. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा नाकारूनही धर्माच्या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण घोषित करतात, केरळमध्ये काँग्रेसचे नेते बीफ बैन ला विरोध करण्यासाठी रस्त्यावर गोहत्या करतात, हे सर्व संविधान विरोधी नाही का? त्यामुळे काँग्रेसने अगोदर स्वतःची पापे बघावीत.

         काँग्रेसने केलेले शिखांचे हत्याकांड आजही लोक विसरलेले नाहीत, तसेच बाटला हाऊसच्या आतंकवाद्यांसाठी अश्रू काढणे, मुंबई येथील २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात कसाब आदी पाकिस्तानी आतंकवादी सहभागी असल्याचे पुरावे असताना कांग्रेसचे नेते “२६/११ का हमला RSS की साझिश” या रा. स्व. संघाला दोषी ठरवणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहतात.

         काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तर आता जाहिरपणे कबूल केले आहे की, मी हिंदू आतंकवाद शब्दाचा वापर करायला नको होता, मात्र पक्षाने सांगितले म्हणून केला. त्यांना ही हिंदूंना आतंकवादी ठरवण्याची थियरी कोणी सांगितली होती, याचा खुलासा कांग्रेस पक्ष का करत नाही? याच थियरीच्या आधारे सनातन संस्थेला ही खोट्या प्रकरणांत गोवण्यात आले होते. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे; मात्र कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने सनातन संस्थेला दोषी ठरवलेले नसतानाही, आम्हाला आतंकवादी संबोधणाऱ्या कांग्रेसच्या नेत्यांवर, तसेच संबंधित पोर्टलवर आम्ही बदनामीचे खटले दाखल करणार आहोत, असेही श्री. वर्तक यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!