HomeमनोरंजनBad news amid T20 World Cup 2026 Indian umpire dies in swarm...

Bad news amid T20 World Cup 2026 Indian umpire dies in swarm of bee attack during cricket match at UP | टी-20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान वाईट बातमी, सामन्यादरम्यान मधमाश्यांच्या हल्ल्यात भारतीय पंचाचा मृत्यू

क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाशांचा हल्ला: वर्ल्ड कप ICC T20 World Cup) चा थरार शिगेला पोहोचलेला असताना देशभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष आंतरराष्ट्रीय सामन्यांकडे लागले आहे. भारतीय संघ सुपर-8 फेरीत दाखल झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याच काळात स्थानिक क्रिकेटविश्वातून आलेल्या एका दुर्दैवी घटनेने साऱ्यांनाच स्तब्ध केले आहे. क्रिकेट हा खेळ आनंद, स्पर्धा आणि क्रीडास्पिरिटसाठी ओळखला जातो; पण कधी कधी अनपेक्षित संकटे अशा प्रकारे कोसळतात की संपूर्ण क्रीडा समुदाय शोकसागरात बुडतो. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अंडर-13 स्तरावरील सामना सुरू असताना मधमाश्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्यात एका वरिष्ठ पंचांचा मृत्यू झाला. मैदानावर खेळ सुरू असताना कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणांतच परिस्थिती इतकी भीषण होईल. ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मधमाश्यांचा थवा अचानक मैदानावर घिरट्या घालू लागला आणि काही क्षणांतच हल्ला चढवला. खेळाडू, पंच आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कसा झाला हल्ला?

उन्नावमधील स्प्रू स्टेडियमवर YMCC आणि पॅरामाउंट संघांमध्ये अंडर-13 सामना सुरू होता. सामना रंगात आलेला असतानाच ड्रिंक्स ब्रेकदरम्यान अचानक मधमाश्यांच्या थव्याने मैदानावर हल्ला चढवला. काही क्षणांतच खेळाडू आणि पंचांमध्ये गोंधळ उडाला. अनेक जण जखमी झाले. या घटनेत वरिष्ठ पंच मानिक गुप्ता गंभीर जखमी झाले. हल्ल्यावेळी ते सुमारे दहा मिनिटे मधमाश्यांच्या वेढ्यात अडकले होते, अशी माहिती समोर आली आहे.

धावपळ, पण प्रयत्न अपयशी

65 वर्षीय मानिक गुप्ता हे कानपूर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न होते आणि स्थानिक स्तरावरील सामन्यात पंच म्हणून जबाबदारी पार पाडत होते. हल्ल्यानंतर त्यांना प्रथम उन्नावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढे कानपूर येथील लाला लाजपत राय रुग्णालय आणि नंतर लक्ष्मीपत सिंघानिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी येथे हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेत अन्य पंच आणि काही खेळाडू जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

क्रिकेटविश्वात शोककळा

कानपूर क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांनी मानिक गुप्ता यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते खेळासाठी समर्पित आणि कर्तव्यदक्ष पंच होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांसोबत संघटना खंबीरपणे उभी राहील आणि शक्य ती सर्व मदत करेल, असेही सांगण्यात आले.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर स्थानिक सामन्यांमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मैदानावरील अशा प्रकारच्या नैसर्गिक धोक्यांपासून खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे संरक्षण कसे करावे, यावर चर्चा सुरू झाली आहे.

क्रिकेट हा उत्साह आणि आनंद देणारा खेळ असला तरी उन्नावमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी 'श्री रामजन्मभूमी...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
spot_img

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...

झिरोधाच्या संस्थापकाने सांगितले आशेचे सूत्र:आशा म्हणजे परिणाम काहीही असो, तुम्ही पुढचे पाऊल टाकणे कधीच...

0
माझ्यासाठी, आशेचा अर्थ फक्त 'सर्व काही ठीक होईल' असा विचार करणे नाही. आशा तेव्हाच सामर्थ्य बनते, जेव्हा तिच्यासोबत कोणतीही समस्या सोडवण्याचा स्पष्ट उद्देश...
error: Content is protected !!