पाथर्डी नगरपालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता मिळवली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व विजयी नगरसेवकांची अधिकृत गटनोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी करण्यात आली. दरम्यान,१५ दिवसांपूर्वी तुतारीच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेविका वंद
.
आज केलेल्या गटनोंदणीत भाजपने गटनेतेपदी डॉ. शारदा गर्जे यांची निवड केली.भाजपने केलेल्या या अंतर्गत खेळीने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.पालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदासह १५,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ५ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. दोन्हीही पक्षाचे व अपक्षाचे संख्याबळ पहाता भाजपला स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागेवर व सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी आपलेच उमेदवार निवडून आणण्यासाठी एका उमेदवाराची तर राष्ट्रवादीला आपला एक स्वीकृत उमेदवार निवडून आण्यासाठी एका उमेदवाराची गरज निर्माण झाल्याने या दोन्हीही पक्षाने या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दीपाली बंग यांच्याशी संपर्क साधला होता तर आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निवडून आलेल्या पाचही नगरसेवकांशी संपर्क साधला होता. टेके यांना भाजपच्या गोटात घेण्यासाठी राजळे यांना नगरसेवक बजरंग घोडके यांनी साथ दिल्याने अखेर टेके यांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेत राजळे यांच्या उपस्थितीत भाजप च्या गटनोंदणीत सहभाग घेतला. भाजप आता टेके यांना उपनगराध्यक्ष करणार की एखाद्या समितीचे अध्यक्षपद देणार या कडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.






















