Homeमनोरंजनबोगस मतदार वाढल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला न्यायालयाने निवडणूक पुढे ढकलल्याचा फटका बसला

बोगस मतदार वाढल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला न्यायालयाने निवडणूक पुढे ढकलल्याचा फटका बसला


महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतील (एमसीए) सत्तेचा गैरवापर, नियमबाह्य मतदार यादी आणि बेजबाबदार कारभारावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने चाप लावला. संघटनेतील अनियमितता ही अत्यंत गंभीर असल्याचे ठणकावून सांगत न्यायालयाने ‘एमसीए’च्या सर्वसाधारण निवडणुकीला सोमवारी थेट स्थगिती दिली.  मंगळवारी होणार्‍या निवडणुकीची कोणतीही प्रक्रिया न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने निवडणूक अधिकार्‍याला दिले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

६ जानेवारीला होऊ घातलेली ‘एमसीए’ची निवडणूक वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.  अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या काही काळात आजीव सदस्यांची संख्या १५४ वरून थेट ५७१ करण्यात आली. ही सदस्यवाढ नियमबाह्य, संशयास्पद आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याचा ठपका न्यायालयात ठेवण्यात आला. ‘एमसीए’च्या या मनमानीविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, लातूर जिल्हा क्रिकेट संघटना, एमसीएचे आजीव सदस्य अनंत निळकंठ मते तसेच, सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे यांच्यासह विविध याचिकादारांनी स्वतंत्र रिट याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी करण्यात आली. केदार जाधव आणि लातूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कमलेश ठक्कर यांच्या वतीने अ‍ॅड. विनित नाईक आणि अ‍ॅड. अभिनव चंद्रचूड यांनी जोरदार युक्तिवाद केला.

सरकारी वकील कविता सोळूंखे यांनी राज्य शासनाची बाजू मांडली. ‘एमसीए’च्या बाजूने अ‍ॅड. अभिषेक मनू संघवी यांनी केलेला बचाव अपयशी ठरला. सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने या निवडणुकीची पुढील प्रक्रिया करण्यास मनाई केली. दरम्यान, वेळेच्या अभावामुळे सविस्तर आदेश न्यायमूर्तींच्या कक्षात तयार करून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत पक्षकारांना उपलब्ध करून दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी ‘एमसीए’तील अनियमितता, नियमांची पायमल्ली आणि सत्तेचा गैरवापर न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. दुसर्‍या बाजूने ‘एमसीए’ने कोणतेही नियम मोडले नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अश्विन दामोदर भोबे यांनी ‘एमसीए’वर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. ‘खेळाच्या संघटनेत अशी मनमानी चालू राहिली, तर खेळाडूंना कधीच न्याय मिळणार नाही,’ असे ठणकावून सांगत न्यायालयाने एमसीएने नियमांचे उल्लंघन करून सदस्य भरती केल्याचे स्पष्ट केले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत निवडणुकीला स्थगिती देण्यात आली.

केदार जाधव यांची मागणी

– ही निवडणूक व प्रस्तावित मतदार यादी रद्द करावी.
– पारदर्शक निवडणूक घेण्यासाठी प्रशासक नेमावा.
– नव्याने समावेश केलेले ४०० मतदार बाद करावेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!