केकेआर मुस्तफिजुर रहमान वाद: गेल्या काही काळापासून बांगलादेशचा खेळाडू मुस्ताफिजुर रहमान आणि त्याच्या आयपीएल मध्ये असलेल्या उपस्थितीमुळे वाद निर्माण झाला. मुस्ताफिजुर रहमानसाठी भारत-बांग्लादेश संबंधांतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मुस्तफिजुर रहमानला संघातून रिलीज केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्ससमोर (KKR) त्यांच्या जागी योग्य खेळाडू शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी एका वेगवान आणि जबरदस्त अशा खेळाडूचे नाव पुढे केले असून, तो KKR साठी ‘गेमचेंजर’ ठरू शकतो, असा त्यांचा दावा आहे.
9.20 कोटी रुपयांना घेतलं होतं विकत
आगामी आयपीएल (IPL 2026) पूर्वी केकेआर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2026 च्या लिलावात 9.20 कोटी रुपयांची मोठी बोली लावून संघात घेतलेल्या मुस्ताफिजुर रहमानला, अलीकडील घडामोडींनंतर बीसीसीआयच्या निर्देशानुसार संघाबाहेर काढावे लागले. त्यामुळे आता त्यांच्या जागी कोण खेळाडू येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे की, KKR ला मुस्ताफिजुरच्या बदल्यात दुसऱ्या खेळाडूला संघात घेण्याची मुभा आहे. यानंतर सोशल मीडियावर आणि क्रिकेट विश्वात विविध नावांची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान श्रीवत्स गोस्वामी यांनी एका वेगळ्या पण प्रभावी पर्यायाकडे लक्ष वेधले आहे.
हे ही वाचा: मुस्तफिजूर रहमानला काढून टाकल्याने बांगलादेश संतापला! IPL प्रसारणाबद्दल घेतला धक्कादायक निर्णय
कोण आहे हा खेळाडू?
गोस्वामी यांच्या मते, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डुआन यानसेन हा KKR साठी उत्तम पर्याय ठरू शकतो. डुआन हा स्टार ऑलराउंडर मार्को यानसेनचा जुळा भाऊ असून, त्याची ओळख वेगवान आणि अचूक गोलंदाजीसाठी आहे. तो सातत्याने 140 ते 145 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता ठेवतो.
KKR च्या गरजांशी जुळणारा प्रोफाइल
डुआन यानसेन केवळ वेगवान गोलंदाजच नाही, तर उपयुक्त फलंदाजही आहे. टी20 क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा ऑलराउंड पर्याय कोणत्याही संघासाठी फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे, त्याने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून एक IPL सामना खेळला असून, भारतीय परिस्थितीचा त्याला काहीसा अनुभव आहे.
हे ही वाचा: मुस्तफिजूर रहमानला सोडल्यानंतर KKR च्या पर्समध्ये येणार 9.20 कोटी रुपये ? जाणून घ्या IPL चा नियम
SA20 लीगमध्ये दमदार कामगिरी
25 वर्षीय डुआन यानसेन सध्या SA20 लीग 2025-26 मध्ये जोबर्ग सुपर किंग्सकडून खेळताना दिसत आहे. प्रिटोरिया कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने चार षटकांत केवळ 23 धावा देत चार विकेट्स घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला. ही कामगिरी त्याच्या क्षमतेची साक्ष देणारी मानली जात आहे.
आतापर्यंत डुआनने पाच वेगवेगळ्या संघांसाठी खेळत 48 टी20 सामने खेळले असून, त्यात त्याने 46 विकेट्स घेतल्या आहेत आणि 329 धावांची भरही घातली आहे.
हे ही वाचा: T20 सामन्यात वाद…पाकिस्तानी गोलंदाज दाखवत होता दम, किरॉन पोलार्डने एका झटक्यात केले शांत; Video
KKR साठी हा निर्णय ठरेल उत्तम?
तरुण आणि अनकॅप्ड खेळाडूंवर विश्वास ठेवण्याची परंपरा KKR कडे आहे. अशा परिस्थितीत डुआन यानसेनसारखा वेगवान, आक्रमक आणि ऑलराउंड क्षमता असलेला खेळाडू संघाच्या रणनीतीत अचूक बसणारा ठरू शकतो.






























