Homeमहाराष्ट्रपुण्यातील एमपीएससीचे विद्यार्थी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मराठी बातम्यांचा निषेध करत आहेत

पुण्यातील एमपीएससीचे विद्यार्थी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मराठी बातम्यांचा निषेध करत आहेत


पुणे MPSC विद्यार्थी: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन निदर्शने केली आहेत. हजारो विद्यार्थी एकत्रित होऊन PSI, STI आणि कंबाइंड परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवण्याची जोरदार मागणी करत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये वयाची मर्यादा ओलांडल्याने अनेकांच्या स्वप्नांना धक्का बसलाय. ही मागणी केवळ वैयक्तिक नाही, तर अनेकांच्या भविष्याशी जोडलेली असल्याचे विद्यार्थी सांगतायत. या आंदोलनात विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने आपली बाजू मांडत असून आपला आवाज ऐकून घेण्याची विनंती करत आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

काही लोकांनी या विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलणारी टोळी किंवा गँग म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचे कान कोणीतरी भरवले असतील, तरीही एकदा आमची खरी बाजू ऐकावी, असे विद्यार्थी सांगतायत. याआधी दोन वेळा परीक्षा पुढे ढकलली गेली तेव्हा त्यांनी अशी कोणतीही मागणी केली नव्हती. उलट जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच आम्ही वयोमर्यादा वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. हे युवक स्वतःला आंदोलनकर्ते गँग म्हणून ओळखले जाऊ नये अशी विनंती करत आहेत. अशा बदनामीमुळे आमचे मनोधैर्य खचू नये, म्हणून ते अपील करत आहेत.

शेवटचा मार्ग म्हणून आंदोलन

या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांनी अनेक आमदार, खासदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यालयात जाऊन शिफारस पत्रे मिळवली. कित्येक उंबरे झिजवले, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणूनच आता ते संविधानाने दिलेल्या शेवटच्या पर्यायाचा अवलंब करत आहेत, म्हणजे रस्त्यावर उतरून आंदोलन. हे आंदोलन त्यांच्या निराशेचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. वेळेवर परीक्षा देण्याची त्यांची इच्छा आहे पण वयोमर्यादा वाढवल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शांततापूर्ण मार्गाने सुरू केलेले प्रयत्न अपयशी ठरल्याने आता जनआंदोलनाचा आधार घेतल्याचे विद्यार्थी सांगतात.

भविष्याचा विचार

स्पर्धा परीक्षेत प्रत्येकाची निवड होणे शक्य नाही, आणि वयाची मर्यादा ओलांडल्याने अनेकांची संधी हुकते. सर्वांनी आपल्या भावा-बहिणींसाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी पाठिंबा द्यावा, उद्या Age Bar झाल्यावर काय करतील? असा प्रश्न त्यांनी विचारलाय. हे आंदोलन केवळ एका गटाचे नाही, तर सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचे आहे. सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देत आहेत, जेणेकरून भविष्यात अशा समस्या कमी होतील, असे आवाहन ते करत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!