Homeमहाराष्ट्रPune Ajit Pawar NCP Nominates Gangster Wives Marane Andekar in Corporation Election...

Pune Ajit Pawar NCP Nominates Gangster Wives Marane Andekar in Corporation Election | अजित पवारांचे गुंडांच्या टोळ्यांना राजकीय पाठबळ: आंदेकरांच्या घरात दोघांना उमेदवारी, गजा मारणेच्या पत्नीलाही तिकीट; राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात – Pune News

महाराष्ट्र कल्याणाची भाषा करणारे, त्यासाठीच काकाला सोडून भाजपसोबत गेल्याचा दावा करणारे अजित पवार यांनी पुण्यात चक्क कुख्यात गुंडांच्या टोळ्यांना राजकीय पाठबळ दिल्याचे समोर आले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना, अजित प

.

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या कुटुंबाला मिळालेल्या या राजकीय पाठबळामुळे पुण्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. बंडू आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या उमेदवारीबाबत अजित पवार गटाने सुरुवातीपासूनच कमालीची गुप्तता पाळली होती. अधिकृत घोषणा न करता थेट अर्ज भरण्यावर भर देण्यात आला. जेणेकरून विरोधाची धार कमी करता येईल. मात्र, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी आंदेकर यांच्या वकिलांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात धाव घेत ‘एबी’ फॉर्म सादर केले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आंदेकरांच्या वतीने त्यांच्या वकिलांनीच ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

कोर्टाची सशर्त परवानगी

बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांनी निवडणूक लढवण्यासाठी विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. “निवडणूक लढवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे,” असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना अर्ज भरण्याची मुभा दिली. मात्र, न्यायालयाने काही कडक अटीही घातल्या आहेत.

अजित पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा कसा?

अजित पवार यांच्या पक्षाकडून आज सकाळी कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिला उमेदवारी देऊन चर्चेला उधाण आणले होते. आता त्यानंतर लगेचच बंडू आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्याने, अजित पवारांच्या ‘गुन्हेगारीमुक्त पुणे’ या घोषणेची खिल्ली उडवली जात आहे. ५ कोटी ४० लाखांच्या खंडणी प्रकरणात आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना सत्ताधारी पक्ष उमेदवारी कशी देऊ शकतो, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

गुंड बंडू आंदेकर आणि गुंड गज्या मारणे या दोघांचाही गुन्हेगारीचा तगडा इतिहास आहे. या दोघांची गुन्हेगारी प्रकरणे राज्यभर गाजली आहेत. असे असताना, सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पाठबळ दिल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आयुषच्या आईचा आत्मदहनाचा इशारा

आंदेकर कुटुंबाला देण्यात येणाऱ्या उमेदवारीला आयुषच्या आईने तीव्र विरोध दर्शवला आहे. “आंदेकर टोळीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत, त्यांना उमेदवारी देऊ नका.” जर त्यांना उमेदवारी दिली तर मी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशारा बंडू आंदेकर याची मुलगी आणि मृत आयुष कोमकरची आई हिने अजित पवारांना दिला होता. मात्र, या आर्त हाकेकडे दुर्लक्ष करत अजित पवारांच्या पक्षाने आंदेकर कुटुंबातील दोघींना प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणुकीसाठी तिकीट दिले.

जयश्री मारणे यांना प्रभाक क्रमांक 10 मधून उमेदवारी

दुसरीकडे, गज्या मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आले आहे. त्या प्रभाग क्रमांक 10 मधून अधिकृत उमेदवार असतील. त्यांना पक्षाने एबी फॉर्मही दिला आहे. जयश्री मारणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गजा मारणे सध्या कोथरूडमधील एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात बंदिस्त आहे. हा दुचाकीस्वार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करत होता. त्याला गजा मारणे याच्या टोळीने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गजा मारणे याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती.

आता चेंडू मतदारांच्या कोर्टात

या वादग्रस्त उमेदवारीमुळे पुण्यात निवडणुकीच्या निकालापेक्षा या उमेदवारांच्या नैतिकतेवरच जास्त चर्चा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुणेकर या ‘गुन्हेगारी’ पार्श्वभूमीच्या उमेदवारांना कौल देतात की नाकारतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!