नांदगाव नगरपरिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेची कामे थांबवू नयेत, अन्यथा पदाचा राजीनामा घ्यावा लागेल, असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी पदग्रहण सोहळ्यात दिला. नगराध्यक्ष सागर हिरे यांच्यासह २० नगरसेवकांच्या पदग्रहणानिमित्त नगरपरिषद इमारतीसमोर आयो
.
आमदार कांदे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या निवडणुकीत २० पैकी १९ नगरसेवक शिवसेना (शिंदे गट)चे निवडून आले असून, एक अपक्ष नगरसेवकही सत्ताधारी गटात सहभागी झाल्याने पालिकेत विरोधी पक्ष राहिलेला नाही. त्यामुळे शहर विकासाच्या दृष्टीने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
यावेळी आमदार कांदे यांनी नांदगाव शहराच्या हद्दवाढीबाबत लवकरच ठोस प्रयत्न केले जातील, असे सांगितले. पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील सहा महिन्यांत शहरवासीयांना २४ तास नळाद्वारे पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शासनाच्या सर्व योजना नांदगाव शहरात प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समृद्धी बँकेच्या अध्यक्ष अंजुम कांदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींच्या प्रश्न सोडवणुकीसाठी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सागर हिरे व नवनिर्वाचित नगरसेवकांना जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते बापुसाहेब कवडे, माजी आमदार अनिल आहेर, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.






















