Homeमहाराष्ट्रMahayuti Seat Sharing Final Mumbai Thane BMC BJP Shiv Sena | युतीचा...

Mahayuti Seat Sharing Final Mumbai Thane BMC BJP Shiv Sena | युतीचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला: भाजप 137, शिवसेना 90 जागांवर लढणार; अमित साटम यांची घोषणा – Mumbai News

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत महायुतीने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी आज संयुक्तपणे या युतीची घोषणा केली. म

.

मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकून शिवसेनेला (अविभाजित) जोरदार टक्कर दिली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत युती करताना जास्त जागा स्वत:कडे ठेवल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप निश्चित झाले आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांसाठी भाजप 137 जागा, तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

अमित साटम काय म्हणाले?

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले की, “यापूर्वी 207 जागांवर आमची चर्चा झाली होती, ती आता 227 पर्यंत पूर्ण झाली आहे. भाजप 137 आणि शिवसेना 90 जागांवर मैदानात उतरतील. आरपीआयसह इतर घटक पक्षांना या जागांमधूनच सामावून घेतले जाईल. कोणामध्येही नाराजी नाही, सर्वांना योग्य स्थान देण्यासाठी थोडा वेळ लागला.”

मुंबईवर मराठीच महापौर

माजी खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही सकारात्मक चर्चेतून हा सुवर्णमध्य काढला आहे. महायुती 150 पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईवर आपलाच मराठी महापौर बसवेल. केंद्र आणि राज्यात आमची सत्ता असल्याने मुंबईचा विकास केवळ महायुतीच करू शकते, असा विश्वास मुंबईकरांना आहे. आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहोत.”

रिपब्लिकन सेनेला किती जागा मिळणार? या प्रश्नावर बोलताना राहुल शेवाळे यांनी सांगितले की, घटक पक्षांना सामावून घेण्याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते आपापल्या कोट्यातून घेतील.

ठाणे महानगरपालिका : शिंदे सेनेचे वर्चस्व

मुंबईत जरी भाजप मोठा भाऊ असला, तरी ठाण्यात मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली ताकद कायम ठेवली आहे. ठाणे महापालिकेच्या 127 जागांपैकी शिवसेना 87 जागांवर, तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उपनमुख्यमंत्र्यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपने सामंजस्याने घेतलेली ही भूमिका युतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

भाजपच्या 66 उमेदवारांची नावे जाहीर

दरम्यान, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 66 उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली आहेत. भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9 मधून, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हेदेखील मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सविस्तर वाचा..



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!