Homeमहाराष्ट्रshivsena mp sanjay raut on gautam adani and sharad pawar family relation...

shivsena mp sanjay raut on gautam adani and sharad pawar family relation explains party stand over mumbai development | शरद पवारच अदानींचे मार्गदर्शक! ऐकताच राऊतांनी म्हटलं, ‘संघर्ष रस्त्यावरही येईल पण…’


शरद पवार आणि गौतम अदानींवर संजय राऊत : पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचं नुकतंच उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी पवार कुटुंबासह खुद्द शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि साऱ्यांशीच अदानी यांचं असणारं नातं समोर आलं. त्याचबाबत सोमवार, 29 डिसेंबर 2025 रोजी पत्रकारांशी संवाद साधताना अदानी आणि पवार यांच्यातील नात्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार यांनी आपली आणि आपल्या पक्षाची बाजू ठामपणे मांडली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

‘गौतम अदानी म्हणतात शरद पवार माझे मार्गदर्शक, आणि सुप्रिया सुळे म्हणतात की अदानी त्यांना भावासारखे…’ याबाबतचा प्रश्न विचारला असता, त्यावर आपलं मत मांडत राऊतांनी अदानींच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून पवारांचं महत्त्वाचं स्थान अधोरेखित करत केलं. ‘ज्यांनी शरद पवार यांचं आत्मचरित्र वाचलं आहे त्यात सर्व स्पष्ट आहे. पवारांनीच गौतम अदानींना उद्योजक म्हणून घडवलं. तेव्हाचा तरुण आणि आताच्या उद्योजकाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्या नेत्याशी त्यांचे कौटुंबीक संबंध निर्माण होतात आणि ते असतीलही. त्यात आक्षेप घेण्याचं कारण मला वाटत नाही’, असं राऊत म्हणाले.

मुंबईवरून अदानींचा विरोध मात्र कायम राहील…

पवारांसोबतचे अदानींचे चांगले संबंध असते तरीही अदानींची आणि आमची मुंबईसंदर्भातील नैतिक लढाई सुरूच राहील असं सांगत हा संघर्ष रस्त्यावरही येऊ शकतो,. आम्ही आमची लढाई थांबवणार नाही असा थेट इशारा दिला. ‘ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अदानींच्या माध्यमातून भाजप करत आहे त्याविरोधात आमचा लढा कायम सुरू राहील. त्यात कोण येतील ते येतील, आलात तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय. ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे, मराठी माणसाविषयी प्रेम आहे ते गौतम अदानींच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतील’, अशा शब्दांत त्यांनी विश्वास व्यक्त केला.

पवारांना मुंबई वाचवण्याचं आवाहन करणार का? असा प्रश्न केला असता काहीसं स्पष्ट शब्दांत उत्तरं देताना, आमच्या अनेक आंदोलनांमध्ये पवारांचा पक्ष आणि नेते सहभागी झाले असून राऊतांनी धारावीच्याही आंदोलनाचा संदर्भ दिला. ‘आम्ही आमचं काम करत असतो. ज्यांना यायचं ते येतील, मुंबई महाराष्ट्रात राहावी असं वाटत असेल ते सर्व घटक येतील. भाजप हा अदानी आणि व्यापाऱ्यांचा मिंधा पक्ष आहे ते सोबत येणार नाहीत. त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण आहे. इथून थैल्या उचलायच्या आणि दिल्लीला नेऊन द्यायचा याच्यापलिकडे त्यांचं काम नाही’, असं म्हणत टीकेचा ओघ भाजपच्या दिशेनं वळवला.

एक मराठी नेता गौतम अदानींचा मार्गदर्शक आहे याचा आपल्याला आनंद वाटायला हवा असं सांगताना, ‘अदानी मोदींना नव्हे, पवारांना मार्गदर्शक म्हणतात, त्यामुळं मतभेदापलिकडे जाऊन याकडे पाहा’ याच वक्तव्याकडे त्यांनी लक्ष वेधत आपला अदानींना मुंबईच्या मुद्द्यावरून विरोध कायम असेल हीच भूमिका मांडली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!