HomeमनोरंजनWinter Health Care Truth Behind Mouth Fog In Winter | फक्त हिवाळ्यातच...

Winter Health Care Truth Behind Mouth Fog In Winter | फक्त हिवाळ्यातच का येते तोंडातून वाफ, उन्हाळ्यात का नाही, याचे परिणाम चांगले की वाईट? जाणून घ्या संपूर्ण माहिती


हिवाळी तोंड धुके कारण: तुम्ही निरिक्षण केलेच असेल की, हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत बोलताना किंवा श्वास बाहेर टाकताना तोंडातून वाफ येते. हॉलिवूड चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की, परदेशात थंड वातावरण असते म्हणून तेथिल रहिवाशांच्या तोंडातून वाफ येते. पण भारतातही थंडीचे प्रमाण वाढले की, आपल्याही तोंडातून वाफ येते. याबाबत अनेकांना फारच नवल वाटते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ही वाफ नक्की येते तरी कुठून? आणि तोंडातून येणारी ही वाफ केवळ हिवाळ्यातच का येते उन्हाळ्यात का नाही? चला तर मग जाणून घेऊया यामागचे नेमके कारण.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हिवाळ्यात तोंडातून वाफ काय येते?

आपले शरीर 70 टक्के पाण्याने बनलेले असते. तसेच आपल्या फुफ्फुसांमध्येही काही प्रमाणात ओलसरपणा असतो. जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा केवळ कार्बन डाऑक्साइडच बाहेर पडत नाही तर, शरीरातील उष्णता आणि आर्द्रताही बाहेर पडते. ही आर्द्रता गॅसच्या स्वरूपात बाहेर पडते, जे डोळ्यांना दिसत नाही.  हिवाळ्यात वातावरणातील तापमान जवळजवळ 37 अंश सेल्सियस इतके असते. त्यामुळे जेव्हा श्वास बाहेर टाकला जातो, तेव्हा गॅसच्या स्वरूपात बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड वायूवर, शरीरातील उष्णतेवर आणि आर्द्रतेवर बाहेरील थंड वातावरणाचा परिणाम होतो. वातावरणातील थंडाव्यामुळे डोळ्यांना न दिसणारी ही आर्द्रता पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमध्ये रूपांतरीत होते, ज्यामुळे तोंडातून वाफ आल्यासारखे वाटते.

उन्हाळ्यात तोंडातून वाफ का येत नाही?

आता याउलट उन्हाळ्यात बाहेरील वातावरणाच्या तापमानाचे प्रमाण शरीराच्या तापमानाच्या आसपास असते. जवळपास असते. त्यामुळे श्वास सोडताना तोंडातून बाहेर पडणाऱ्या कार्बनॉडायऑक्साईड वायूवर आणि उष्णतेवर बाहेरील वातावरणाचा काहीच परिणाम होत नाही, म्हणजेच पाण्याच्या थेंबात रूपांतरीत होत नाहीत. यामुळे केवळ थंडीमध्येच तोंडातून वाफ येते आणि उन्हाळ्यात असे नाही होत.

तोंडातून येणाऱ्या वाफेचे आरोग्यावर परिणाम होतात का?

हिवाळ्यात तोंडातून वाफ येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जर तोंडातून येणाऱ्या वाफेचे प्रमाण जास्त असेल तर मात्र तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हिवाळ्यात सर्दी-खोकला यासारखे सामान्य आजार होण्याचे प्रमाण अधिक असते. पण तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल आणि नाक बंद होऊन तोंडाने श्वास घ्यावा लागत असेल तर तोंडातून जास्त वाफ येते. काहीवेळा हे इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. याशिवाय काहीजणांना तोंडाने श्वास घेण्याची सवय असते. यामुळे नाकाऐवजी तोंडातून हवा शरीराच्या आत गेल्याने थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचते. ज्यामुळे घसा कोरडा पडणे, फुफ्फुसांच्या समस्या जाणवणे, श्वास नीट न घेता आल्यामुळे झोपेत अडथळे येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच तोंडातून वाफ येणे नैसर्गिक आहे, पण यासोबत नाक बंद असणे, घसा दुखणे, खोकला किंवा श्वसनाचे इतर त्रास असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!