आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील जाचक अटी आणि तांत्रिक गुंतागुंतीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला असून, निवडणूक आयोगाचे अधिकारी भारतीय जनता प
.
प्रशासकीय दिरंगाई आणि उमेदवारांचे हाल
काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी यासंदर्भात प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. उमेदवारांना विविध विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. विशेषतः कंत्राटदार नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी संपूर्ण मुंबईत केवळ ‘मशिद बंदर’ येथील एकाच पालिका कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने उमेदवारांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.
शौचालयाचे प्रतिज्ञापत्र: नव्या अटीवर आक्षेप
यावेळेस निवडणूक आयोगाने केवळ उमेदवाराकडूनच नव्हे, तर त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणाऱ्या ‘अनुमोदका’कडूनही त्याच्या घरात शौचालय असल्याचे प्रतिज्ञापत्र मागितले आहे. या नवीन अटीमुळे उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. “आधी केवळ उमेदवाराच्या स्वघोषणापत्रावर काम चालायचे, मग आता अनुमोदकासाठी ही अट कशासाठी?” असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ता राकेश शेट्टींची प्रतिक्रिया
”निवडणूक आयोगाचे अधिकारी सध्या भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्यासारखे वागत आहेत. निवडणुकीचा अर्ज भरणारा उमेदवार हा काही कंत्राटदार नाही, तरीही त्याला कंत्राटदार नसल्याचे NOC सक्तीचे केले आहे. त्यासाठी संपूर्ण मुंबईत फक्त मशिद बंदरचे एकच कार्यालय दिले आहे, जिथे प्रचंड गोंधळ सुरू आहे. तसेच, अनुमोदकाकडून शौचालयाचे प्रतिज्ञापत्र मागणे ही शुद्ध अडवणूक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांचे अर्ज बाद व्हावेत, या राजकीय कटाचाच हा एक भाग आहे. आम्ही याविरोधात लवकरच राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत,” असे काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी सांगितले आहे.






















