Homeमनोरंजनऍशेस 2025-26 ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी कसोटी जिंकली

ऍशेस 2025-26 ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी कसोटी जिंकली


ऍशेस कसोटी २०२५-२६ : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia VS England) यांच्यात अ‍ॅशेज 2025-26 टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. या सामन्यात गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आणि फक्त 2 दिवसात इंग्लंडने 4 विकेटने सामना जिंकला. याच सोबत इंग्लंडने सीरिजमध्ये पहिला विजय मिळवला आणि 14 वर्षांपासून विजयाची प्रतीक्षा संपवली. ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतल्यावर सुद्धा पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच सीरिजमधील सुरुवातीचे तीनही सामने जिंकून अ‍ॅशेज सीरिजमध्ये विजयी आघाडी घेतली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

2 दिवस सुद्धा नाही चालली बॉक्सिंग डे :

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या पिचवरील जवळपास 10 मिलीमीटरचं गवत हे गोलंदाजांसाठी मदतीशीर ठरलं. इंग्लंडने या सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग फक्त 152 धावांवर संपली. या दरम्यान मायकल नेसरीने सर्वाधिक 35 धावा केल्या, शिवाय कोणताही फलंदाज 30 धावांचा आकडा नाही गाठू शकला. इंग्लंडकडून जोश टोंगने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर गस अ‍ॅटकिन्सननेही 2 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चांगली झाली नाहीच मात्र इंग्लंडची फलंदाजी सुद्धा खास ठरली नाही. ऑस्ट्रेलियाने त्यांना 110 धावांवर ऑल आउट केले. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 42 धावांची आघाडी घेतली होती. दरम्यान हॅरी ब्रूकने सर्वात जास्त 41 धावा ठोकल्या. तो या इनिंगमध्ये 30 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला. तर दुसरीकडे माइकल नेसर ने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. स्कॉट बोलँडनेही तीन विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्कनेही दोन विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा :रोहितला बॉलिंग द्या…’ स्टेडियममध्ये फॅन्सनी दिल्या घोषणा, मग हिटमॅनने काय केलं पाहा Video

इंग्लंडने संपवला 14 वर्षांचा वनवास :

पहिल्या इनिंगमध्ये 42 धावांची आघाडी घेतलेला ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये खास कामगिरी करू शकला नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 34.3 ओव्हर क्रीजवर टिकू शकला आणि 132 धावा करून ऑलआउट झाला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 46 धावा केल्या. परंतू इतर फलंदाज फ्लॉप ठरले. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने शानदार गोलंदाजी केली आणि चार विकेट्स घेतल्या आणि संघाला सावरण्यास मदत केली. कर्णधार बेन स्टोक्सनेही तीन विकेट्स घेतल्या.

विजयासाठी 175 धावांचं टार्गेट असताना इंग्लंडला दमदार सुरुवात मिळाली. जॅक क्रॉली आणि बेन डकेटने पहिल्या विकेटसाठी 51 धावा केल्या. जॅक क्रॉलीने 37 आणि बेन डकेटने 34 धावा केल्या. इंग्लंडच्या ओपनिंग जोडीकडून ही पहिलीच अर्धशतकीय पार्टनरशिप ठरली. त्यानंतर जेकब बेथेलने एक शानदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडचा 14 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिलाच टेस्ट विजय होता. याआधीचा विजय 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झाला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!