विजय हजारे ट्रॉफी 2025-26 : टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा हे दोघे बऱ्याच वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) खेळण्यासाठी मैदानात उतरले. आपापल्या देशांतर्गत संघाकडून खेळणाऱ्या या दिग्गजांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मैदानात गर्दी केली होती. विराट कोहलीने दिल्लीकडून खेळलेल्या दोन्ही सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. पाहिल्या सामन्यात त्याने शतक ठोकलं तर दुसऱ्या सामन्यात सुद्धा त्याने 70 धावांची कामगिरी केली. अशातच सध्या विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात बसमधून उतरताना कोणाच्याही नकळत ड्रायव्हरने त्याला रेकॉर्ड केलं.
संपूर्ण संघाला केलं रेकॉर्ड :
विराट कोहली आता आगामी न्यूझीलंड वनडे सीरिजची तयारी करण्यासाठी बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस येथे गेला आहे. रविवार 11 जानेवारी रोजी न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजचा पहिला सामना होणार आहे. गुजरात विरुद्ध शुक्रवार 26 डिसेंबर रोजी पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यादरम्यान दिल्लीचा संघ बसमधून खाली उतरत होता. यावेळी बस ड्रायव्हरने स्टरेरींग जवळ कॅमेरा लावला आणि विराट कोहली सह इतर खेळाडूंना सुद्धा रेकॉर्ड केलं. मात्र हा व्हिडीओ रेकॉर्ड करताना कोणालाही कळू नये म्हणून ड्रायव्हरने चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दिले नाही. किंवा कोणताही उत्साह दाखवला नाही.
ड्रायव्हरने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव केलाय. एकाने कमेंट करत लिहिले की, ‘वाह काय डेडिकेशन… कंटेंट क्रिएशनसाठी 10 पैकी 10 मार्क’. एकाने लिहीलं की ‘बस ड्रायव्हरने व्हिडीओ स्मार्टली रेकॉर्ड केलाय’.
हेही वाचा : फक्त दोन दिवसात संपली बॉक्सिंग डे टेस्ट, 14 वर्षांनी इंग्लंडने मारली बाजी, ऑस्ट्रेलियाचा पराभव
पाहा व्हिडीओ :
आजचा सर्वोत्तम व्हिडिओ.
एका बस चालकाला विराट कोहली टीम बसमधून उतरताना, फोन स्थिर, शरीर गोठलेले, शून्य प्रतिक्रिया नोंदवण्याचा सर्वात हुशार मार्ग सापडला. विराटची रेकॉर्डिंग करण्यासाठी माणूस 30 सेकंद कॅरेक्टरमध्ये राहिला pic.twitter.com/p8SWUMsP6F
Vipintiwari952) दृश्ये. 26 डिसेंबर 2025
विराट कोहलीचं दमदार पुनरागमन :
विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफी 2025 -26 च्या पहिल्याच सामन्यात शतकीय कामगिरी केली होती. बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस ग्राउंड 1 मध्ये 24 डिसेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश सामन्यात विराटने 83 बॉलमध्ये विराटने हे शतक पूर्ण केले. त्याने त्या सामन्यात 131 धावांची खेळी केली होती. तर 26 डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात विराटने 77 धावा केल्या. विराटने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये दोन सामने खेळून 208 धावा केल्या आहेत. विराट कोहली 2010 नंतर प्रथमच विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उतरला. तब्बल 15 वर्षांनी त्याला देशांतर्गत संघासाठी खेळताना पाहण्यासाठी फॅन्स सुद्धा उत्साहित होते.































